वाई:-निरोगी राहण्यासाठी योगा आवश्यक – अशोकराव मलठणे
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई: दि.23 जून
निरोगी राहण्यासाठी योगा आवश्यक – अशोकराव मलठणे

वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर
महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभाग, क्रीडा विभाग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व स्टाफ वेल्फेअर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘योग व मार्गदर्शन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, सातारा जिल्हा पतंजली योग समितीचे अध्यक्ष अशोकराव मलठाणे, वाई तालुका पतंजली योग समितीचे अध्यक्ष रामदास राऊत, वाई तालुका पतंजली योग समितीचे सचिव पांडुरंग भिलारे यांनी विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण दिले. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. (डॉ.) विनोद वीर, मेजर डॉ. समीर पवार पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षणाचे प्रशिक्षक विशाल महांगडे, क्रीडा शिक्षक शिवराज तलवारे यांची उपस्थिती होती.
अशोकराव मलठणे म्हणाले, योग ही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी योगासने करणे आवश्यक आहे. योगामुळे शरीराबरोबरच मनही सशक्त होते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यांनी योगासने आणि प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक दिले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, दररोज योगा केल्यामुळे शरीर लवचिक बनते. मन प्रसन्न रहाते. दिवसभर थकवा जाणवत नाही. शारीरिक व मानसिक क्षमता वाढते. त्यांनी स्वानुभवातून योगासनाचे महत्त्व सांगितले. मेजर डॉ. समीर पवार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, शिवराज तलवारे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास एन.सी.सी.चे छात्र, भरतीपूर्व प्रशिक्षणाचे प्रशिक्षणार्थी, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.




