आरोग्य व शिक्षणक्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूरात स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; गावठी कट्टा, जिवंत काडतुसे व १५.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) श्रीरामपूरात स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; गावठी कट्टा, जिवंत काडतुसे व १५.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त.

श्रीरामपूर प्रतिनिधी :
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव रोडवरील एस कॉर्नर परिसरात गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या एका सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत त्याच्याकडून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, मोबाईल व स्कॉर्पिओ वाहनासह एकूण १५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. २२ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हरेगाव फाटा परिसरात काळ्या रंगाच्या विनानंबर स्कॉर्पिओ वाहनातून एक इसम गावठी कट्टा बाळगून फिरत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने ग्रामीण रुग्णालयासमोरील एस कॉर्नर रोड परिसरात सापळा रचला.
दरम्यान, हरेगावकडून श्रीरामपूरच्या दिशेने येणारी विनानंबर स्कॉर्पिओ थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव अविनाश धनराज माकोणे (वय २७, रा. निफाड, जि. नाशिक) असे सांगितले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे, दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि १५ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ असा एकूण १५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस तपासात आरोपीविरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार रमेश रफीक अत्तार यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९९/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम (Arms Act) कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.
पोलीस अधीक्षक मुम्मुका सुदर्शन यांनी जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि हरीश भावे, पोउपनि संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार विष्णू भागवत, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाट, भाऊसाहेब कांबळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडेकर, महिला पोलीस अंमलदार सोनल भगवत तसेच चालक भगवान धुळे व अरुण मोरे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात जिल्ह्यात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

2) श्रीरामपूर / माळेवाडी:-रविवारी पोलिओ डोस एकही बालक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या.

श्रीरामपूर / माळेवाडी ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) जिल्ह्यात मुला – मुलींचे लिंग गुणोत्तर संतुलित राखण्यासाठी लिंग गुणोत्तर कमी असलेल्या गावांवर विशेष लक्ष केंद्रीय करावे . ग्रामस्थांसाठी जनजागृती कार्यशाळांचे आयोजन करून समाजामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करावे .तसेच येत्या रविवारी दि २८ जून रोजी शबविण्यांत येणारे पल्स पोलिओ अभियान प्रभावीपणे आणि यशस्वीरीत्या राबवून एकही बालक लसीकरणा पासून वंचित राहणार नाही यांची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी दिले .
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विभागाच्या कामकाज आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय घोगरे ‘ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगीजे अशासकीय सदस्य डॉ सुधा कांकरिया यांच्या सह संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते . तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीय सहभागी झाले होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button