कृषी व व्यापारक्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-गरीबांचा घास काळ्या बाजारात विकणाऱ्यांवर LCBचा धडक छापा!

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

गरीबांचा घास काळ्या बाजारात विकणाऱ्यांवर LCBचा धडक छापा!

सोनगाव सात्रळ येथे १२.०२ लाखांचा शासकीय गहू-तांदूळ व दोन वाहने जप्त; एक आरोपी ताब्यात.

श्रीरामपूर | प्रतिनिधी
गरीबांसाठी शासनामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ शिवारातून १२ लाख २ हजार ७०० रुपयांचा शासकीय गहू, तांदूळ व दोन वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत यासीर सादिक तांबोळी (रा. सोनगाव सात्रळ, ता. राहुरी) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माननीय पोलीस अधीक्षक मुम्मुका सुदर्शन यांनी जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंच्या काळाबाजाराविरोधात प्रभावी कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ येथील साई बालाजी फर्निचर शेजारील पत्र्याच्या गोडाऊनमध्ये रेशनिंगचा शासकीय गहू व तांदूळ विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आला आहे.
या माहितीच्या आधारे पोलीस उपअधीक्षक अनंत सालगुडे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सुनील पवार, रिचर्ड गायकवाड, रमीज राजा अत्तार व इतर कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले. पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात गहू व तांदळाच्या गोण्या तसेच दोन वाहने आढळून आली.
चौकशीदरम्यान ताब्यातील आरोपी यासीर सादिक तांबोळी याने आजूबाजूच्या रेशनिंग दुकानांतून शासकीय गहू व तांदूळ काळ्या बाजारातून खरेदी करून त्याचा साठा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
जप्त मुद्देमाल
१२१ गोण्या गहू – ६,९९० किलो, किंमत ₹२,०९,७००
११७ गोण्या तांदूळ – ५,८६० किलो, किंमत ₹२,९३,०००
दोन वाहने – किंमत ₹७,००,०००
एकूण जप्त मुद्देमाल : ₹१२,०२,७००
या प्रकरणी आरोपीस मुद्देमालासह राहुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून गुन्हा रजिस्टर क्रमांक ७१३/२०२६ अन्वये जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ च्या कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मुका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली असून, रेशनिंग धान्याच्या काळाबाजाराविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button