वैजापूर :- गुन्हेगारास पोलीस प्रशासनाचा जाणीवपूर्वक पाठीशी घालण्याचा प्रयत्न, अपघातग्रस्ताचे मनोगत.
प्रतिनिधी:- बाळासाहेब सरोदे औरंगाबाद जिल्हा :-9373299248

गांव – संजरपुरवाडि ता . वैजापुर जि . औरंगाबाद
जख्मी : देवचंद चंपालाल जारवाल
जख्मीची पत्नी : वर्षा देवचंद जारवाल
ट्रैक्टर चालक : घनशाम महाजन जारवाल
घटना स्थळ : सांडु शिवलाल बम्हणावत यांच्या शेताजवळ
ट्रैक्टर चालक घनश्याम महाजन जारवाल यांनी दुचाकी स्वार यांना धडक देऊन त्यांना बेदम मारहाण केली असून ट्रॅक्टर मधील पाना घेऊन डोक्यात मारला त्यामुळे अपघातग्रस्ताच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला. यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद केली असून पोलीस प्रशासनातील कर्मचारी अधिकाऱ्याने आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा तपास करून पंचनामा केलेला नाही अथवा गुन्हेगारास अटक केलेली नसून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. गोरगरिबांना न्याय मागण्याचा अधिकार आहे की नाही असा खडा सवाल अपघातग्रस्तांच्या परिवाराकडून होत आहे. अशा गावगुंडांना पोलीस प्रशासनाने आपला खाक्या दाखवावा आणि अशा गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांवरती कारवाई करावी. अशी मागणी देवचंद चंपालाल जारवाल यांनी केली आहे. या लोकांकडून माझ्या जीवित असे धोका आहे अशी त्यांनी स्टार न्युज ला बोलताना वक्तव्य केले आहे.
जिल्हा प्रतिनिधि औरंगाबाद
RPS star news
B.H sarode