आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-अनिल लाखे यांचा सामाजिक कार्याबद्दल गौरव.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-अनिल लाखे यांचा सामाजिक कार्याबद्दल गौरव.

वाई येथील किसन वीर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रयोगशाळा परिचर श्री.अनिल लाखे यांना अखिल महाराष्ट्र कोल्हाटी-डोंबारी समाज संघटनेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात सासवड येथे त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराचे वितरण आमदार श्री.सुनील कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, समाजबांधव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. लाखे यांनी अनेक वर्षांपासून समाजसेवेचे व्रत हाती घेतले असून सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनपर उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये गायन, अभंगगायनाच्या माध्यमातून ते समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत. त्यांनी आजवर मराठी भाषा गौरवदिनानिमित्त अनेक कार्यक्रमामध्ये मराठी गीतांचे सादरीकरण केले. मराठी साहित्य संमेलनामध्ये गायलेल्या गीताबद्दल त्यांना स्व.डॉ.शंतनू अभ्यंकर यांचा हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, शिक्षणाचे महत्त्व तसेच सामाजिक एकोपा यांसारख्या विषयांवर ते सातत्याने जनजागृती करीत असतात.
त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड आहे. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पाली भाषेतून पदवी संपादन केली असून ते पुढे नोकरी करीत आपले पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. त्यांना संशोधनाची प्रचंड आवड आहे. रसायनशास्त्र विभागात ते प्रयोगशाळेत नाविन्यपूर्ण गोष्टींचा वेध घेत असतात.
कोल्हाटी-डोंबारी समाजासह विविध समाजघटकांतील वंचित, गरजू आणि दुर्बल व्यक्तींच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन अखिल महाराष्ट्र कोल्हाटी-डोंबारी समाज संघटनेने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या कार्यामुळे समाजातील युवकांना सकारात्मक दिशा मिळत असून सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होत आहे.
या पुरस्काराबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.मदनदादा भोसले, उपाध्यक्ष श्री शंकरराव गाढवे, सचिव डॉ.जयवंत चौधरी, खजिनदार श्री नारायणराव चौधरी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा.(डॉ.) विनोद वीर, मराठी विभागप्रमुख प्रा.(डॉ.) चंद्रकांत कांबळे, डॉ.संग्राम थोरात, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.दीपाली पाटील, डॉ.संदीप वाटेगावकर, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
श्री. लाखे यांच्या या सन्मानाबद्दल वाई परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

2) वाई:-‘किसन वीर’ मध्ये शुक्रवारी राज्यस्तरीय चर्चासत्र.

वाई दि.१८ जून २०२६
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील अंतर्गत दर्जा हमी कक्ष, स्टाफ वेल्फेअर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ची अंमलबजावणी करताना” या विषयावर शुक्रवार दि. १९ जून रोजी एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.जयवंत चौधरी यांच्या हस्ते सकाळी १०:०० वाजता होणार आहे. उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे भूषविणार आहेत.

सदर चर्चासत्र चार सत्रांमध्ये होणार असून, दुसऱ्या सत्रात साधनव्यक्ती म्हणून सुटा संघटनेचे अध्यक्ष आर. के. चव्हाण हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० : उद्दिष्टे, अपेक्षा आणि वास्तव तसेच देऊर महाविद्यालयातील इंग्रजीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मनोज गुजर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० आणि शासन निर्णय या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
चर्चासत्राच्या तिसऱ्या सत्रात साधनव्यक्ती म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य डॉ. राजेश निमट हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण: संधी आणि आव्हाने तसेच कागल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एल.कदम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि उच्च शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
समारोप समारंभासाठी कोल्हापूर उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सत्राचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले भूषविणार आहेत.

सदर चर्चासत्रासाठी शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्राचार्य व प्राध्यापकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी केले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button