क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी विशेष मोहीमे अंतर्गत आरोपीकडुन दोन गावठी बनावटीचे कट्टे व काडतुसे जप्त.

पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी विशेष मोहीमे अंतर्गत आरोपीकडुन दोन गावठी बनावटीचे कट्टे व काडतुसे जप्त.

दिनांक २६/०५/२०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीए निरीक्षक राहुल खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पालीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफसह पेट्रोलींग करीत असताना अंमलदार मितेश, चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, सुदरनगर, मांगडेवाडी, कात्रज, पुणे येथे एक इसम अग्नीशस्त्र घेवुन थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच नमुद अधिकारी व अमलदार यांनी सुदरनगर, मांगडेवाडी, कात्रज, पुणे येथे जावुन बातमीप्रमाणे इसमाचा शोध घेतला असता सदर ठिकाणावरील गुरुदत्त मित्र मंडळाचे मंदीरालगतचे मोकळया जागेमध्ये इसम नामे सोहम गोविंद धुमाळ, वय १८ वर्षे ७ महीने, रा. फ्लॅट नंबर २०३, पुण्यनगरी सोसायटी, आयप्पा मंदीराजवळ, कृष्णा इन्क्लेव्ह, वडगाव- शेरी, पुणे हा त्याचे ताब्यात १,०१०००/- रुपये किंमतीचे दोन गावठी बनावटीचा कट्टे व दोन जिवंत काडतुसांसहीत दिनांक २०/०५/२०२६ रोजी १३.२३ वा मिळुन आल्याने त्याचेकडुन दोन गावठी बनावटीचा कट्टे व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असुन, त्याचेविरुध्द सरकारतर्फे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३१४/२०२६, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि स्वप्निल पाटील हे करीत आहेत. सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी आदेशीत केलेल्या विशेष माहीमेअंतर्गत करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. संजय दराडे साो, पोलीस.. सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक – राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण सावळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.

(राहुलकधार खिलारे) वरीष्ठ पोलीस निरीक्षक

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button