आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कराड:-आ.मनोजदादा घोरपडे यांचा वाढदिवस साधेपणाने.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

आ.मनोजदादा घोरपडे यांचा वाढदिवस साधेपणाने.

कराड:- कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मा. मनोजदादा घोरपडे यांनी यंदाचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व नियोजित स्वागत समारंभ, सत्कार कार्यक्रम तसेच वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रम रद्द केले आहेत.

जनतेच्या भावनांचा आदर करणारे आणि सामाजिक भान जपणारे नेतृत्व म्हणून आ. मनोजदादा घोरपडे यांचा हा निर्णय सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. सध्याच्या गंभीर परिस्थितीचा विचार करून कोणतेही जल्लोषाचे कार्यक्रम न घेता साधेपणाने वाढदिवस पाळण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

तसेच वाढदिवसाच्या दिवशी ते बाहेरगावी असणार असल्याने शुभेच्छा स्वीकारण्यासाठीही उपलब्ध राहणार नसल्याची माहिती त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे.

सत्ता, पद आणि प्रसिद्धीपेक्षा सामाजिक संवेदनशीलतेला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून आ. मनोजदादा घोरपडे यांनी पुन्हा एकदा जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून कार्यकर्त्यांनीही साधेपणाने वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

💐मा. आमदार श्री. मनोजदादा घोरपडे यांना वाढदिवसानिमित्त आरोग्यदायी, यशस्वी व दीर्घायुषी जीवनासाठी RPS स्टार न्यूज, परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा..!

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button