सातारा:-अभय एक्सेलेंट् कला क्रिडा गणेश उत्सव मंडळ व विघ्नहर्ता स्पोर्ट्स च्या वतीने उन्हाळी स्वसंरक्षण शिबिर उत्साहात संपन्न.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

अभय एक्सेलेंट् कला क्रिडा गणेश उत्सव मंडळ व विघ्नहर्ता स्पोर्ट्स च्या वतीने उन्हाळी स्वसंरक्षण शिबिर उत्साहात संपन्न.

सातारा:- आजच्या काळात विद्यार्थ्यांनी शिक्षणा सोबत स्वसंरक्षणाचे धडे घेणे अत्यंत गरजेचे बनले असुन यांचं सामाजिक जाणिवेतून अभय एक्सेलेंट् कला क्रीडा गणेशोत्सव मंडळ व विघ्नहर्ता स्पोर्टस यांच्या संयुक्त विद्यमानाने नागठाणे गावातील जिल्हा परिषद केंद्र शाळा प्रांगणामध्ये ३ मे ते २३ मे पासून सुमारे (२० दिवस) उन्हाळी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये नागठाणे गावचे सुपुत्र व रेन बु काण कराटे असो.महाराष्ट्र राज्य यांचे सचिव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कृत श्री.अक्षय बाजीराव साळुंखे सर, दिपक लोखंडे सर, अर्जुन सर यांच्या उपस्थितीत मलखांब, कुस्ती, दानपट्टा, कराटे, स्वतःचे संरक्षण कसे करावे, संकटाच्या प्रसंगी धैर्याने कसे सामोरे जावे,आत्मविश्वास कसा वाढवावा याबाबत प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले असे विविध प्रकारचे स्वसंरक्षणाचे धडे मुलांना शिकविण्यात आले. तसेच प्रशिक्षण शिबिराच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या प्रांगणा मध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद नागठाणे गटाचे विद्यमान सदस्य श्री. अजित साळुंखे सर, पंचायत समिती नागठाणे गणाचे विद्यमान सदस्य श्री. संतोष लक्ष्मण साळुंखे, अभय एक्सेलेंट् कला क्रीडा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मंडळाचे पदाधिकारी यांच्या हस्ते शिबिरातील मुलांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करून अभिनंदन करण्यात आले प्रशिक्षण शिबिराचे कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडण्याकरिता जिल्हा परिषद केंद्र शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संदिप साळुंखे, उपाध्यक्ष सौ.कविता प्रशांत साळुंखे, सदस्य श्री. गणेश साळुंखे,श्री. मंगेश कारंजकर व सर्व पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे




