ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पाचगणी:-पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, राज्यमंत्री महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीप भाई कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचगणी येथे पदाधिकाऱ्यांची निवड.

पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, राज्यमंत्री महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीप भाई कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचगणी येथे पदाधिकाऱ्यांची निवड.

सातारा पांचगणी.
पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आमदार, मा. खासदार, लॉंग मार्च चे प्रणेते,आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेतृत्व प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या निर्देशाने , राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राज्यमंत्री -उपाध्यक्ष महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ जयदीप भाई कवाडे वाई पाचगणी दौऱ्यावर असताना त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचगणी शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांची निवड संपन्न झाली. यावेळी वाई तालुका अध्यक्ष पदी बोपर्डी गावचे विजय सातपुते, वाई तालुका उपाध्यक्षपदी मांढरदेव चे संतोष शेळके , वाई तालुका संघटक पदी बापू सातपुते,युवक तालुका वाई कार्याध्यक्षपदी आकाश गायकवाड, युवक तालुका वाई उपाध्यक्ष पदी रोहित कवळे त्याचबरोबर पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित राष्ट्रीय मजदूर सेनेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदी नित्यानंद मोरे, राष्ट्रीय मजदूर सेनेच्या वाई तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत रासकर यांची नियुक्ती सन्माननीय जयदीप भाई कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष युवराज गोस्वामी साहेब, सातारा जिल्हाध्यक्ष युवराज जी कांबळे, सातारा जिल्हा युवक अध्यक्ष अनमोल जी कांबळे, सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे, राष्ट्रीय मजदूर सेना सातारा जिल्हा संघटक विकास दादा जाधव आणि कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2) वाई:-कामगार नेते रूपेश भाऊ मिसाळ यांचा वाढदिवस गौमाताना चारा वाटप करून साजरा.

सातारा वाई.
लोकसेवक श्री रुपेश भाऊ मिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो गाईंना चारा वाटप
कामगार आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री लोकसेवक रुपेश भाऊ मिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात व हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये वेळे येथील करुणा मंदिर गोशाळा या ठिकाणी असलेल्या हजारो गाईंना मोठ्या प्रमाणात चारा वाटप करण्यात आला उन्हाळ्याच्या दुष्काळी चारा टंचाई च्या परिस्थितीमुळे चाऱ्याचा प्रश्न गोशाळा येथे उपस्थित झाला होता तेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून दोन मे पासून गाईंना चारा उपलब्ध व्हावा यासाठी रुपेश भाऊ यांनी सोशल मीडियाच्या मार्फत शेतकऱ्यांना आव्हान केले होते आणि त्या नुसार वाई तालुक्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपापल्या पद्धतीने गोशाळा येथील गाईंना चारा उपलब्ध करून दिला खरंतर रुपेश भाऊ गेली पाच वर्ष वेळेतील गोशाळेला चारा देण्याचा उपक्रम राबवत आहेत यावर्षी मोठ्या प्रमाणात चारा त्यांनी गोशाळेला उपलब्ध करून दिला त्याबद्दल सर्व स्तरावरती त्यांचं अभिनंदन व कौतुक केले जात आहे या कार्यक्रमाला वाई पंचायत समिती सदस्य श्री स्वप्निल भाई गायकवाड यांनी रुपेश भाऊंच्या कार्याला व त्यांनी केलेल्या कामाला खूप खूप शुभेच्छा दिल्या त्यांच्या हातून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात गोमातेची सेवा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली सदैव आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केले त्यावेळी श्रीकांत बापू निकाळजे बाजीगर इनामदार शनि मिसाळ सचिन मिसाळ धर्मपाल मिसाळ सागर कांबळे अजित जाधव यादव सर सुरज कांबळे विजय सातपुते विजय कांबळे संजय मोरे आरिफ मनेर बापू भोसले संदीप जाधव अनुराग सवणे अमर वाघमारे तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button