मायणी:-मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले – सुलोचना कचरे यांचे दुःखद निधन; मायणी परिसरात हळहळ.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मायणी:-मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले – सुलोचना कचरे यांचे दुःखद निधन; मायणी परिसरात हळहळ.

मायणी प्रतिनिधी :
खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर यांचे स्वीय सहाय्यक मधुकर बाबुराव कचरे यांच्या मातोश्री श्रीमती सुलोचना बाबुराव कचरे (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच मायणी परिसरात शोककळा पसरली असून विविध स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सुलोचना कचरे या शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभावाच्या म्हणून परिसरात परिचित होत्या. सामाजिक व कौटुंबिक नातेसंबंध जपणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने कचरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांकडून कुटुंबीयांचे सांत्वन केले जात आहे.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा मातीचा सावडणे विधी कार्यक्रम दि. २५ रोजी सकाळी ९ वाजता होणार असल्याची माहिती कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली.
सुलोचना कचरे यांच्या निधनामुळे मायणी परिसराने एक प्रेमळ व जिव्हाळ्याचे व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.




