महाबळेश्वर पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीची पाहणी.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

महाबळेश्वर पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीची पाहणी.

महाबळेश्वर प्रतिनिधी: उत्तम भालेराव सातारा जिल्ह्याचे एसपी निखिल पिंगळे साहेबांकडून महाबळेश्वर येथील नवीन पोलीस स्टेशन इमारतीचे प्रत्यक्ष पहानी करन्यात आली. बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून यावेळी बांधकामातील छोट्या-मोठ्या त्रुटी, देखभाल व आवश्यक सुधारणा याबाबत संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सूचना देण्यात आल्या.
या पाहणीदरम्यान स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) निखिल पिंगळे साहेब उपस्थित राहून संपूर्ण कामाची बारकाईने तपासणी केली. तसेच महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे पीआय सांडभोर साहेब, एपीआय परजने साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) देशपांडे साहेब, माजी सभापती संजूबाबा गायकवाड यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नवीन इमारतीचे आधुनिक पद्धतीने सुरू असलेले काम, सुविधा व दर्जेदार बांधकाम पाहून एसपी साहेबांनी समाधान व्यक्त केले. तसेच उर्वरित कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या.
महाबळेश्वर शहराच्या सुरक्षाव्यवस्थेसाठी ही नवीन इमारत अधिक सक्षम, सुसज्ज व नागरिकांसाठी सुविधाजनक ठरणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.




