पुसेसावळी:-सौरभ चव्हाण यांची जिल्हा सहसचिवपदी निवड; नूतन कार्यकारिणी जाहीर.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सौरभ चव्हाण यांची जिल्हा सहसचिवपदी निवड; नूतन कार्यकारिणी जाहीर.

पुसेसावळी:- महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ संचलित सातारा जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या नूतन जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. या कार्यकारिणीत जिल्हाध्यक्षपदी विशाल घोरपडे, सचिवपदी चंद्रकांत तोरणे, तर उपाध्यक्षपदी विशाल निकम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
तसेच कार्याध्यक्षपदी केतन भिसे, सहसचिवपदी सौरभ चव्हाण व अनिकेत शिंदे, खजिनदारपदी राहुल सावंत, जिल्हा संघटकपदी दीपक ढाणे, प्रदीप शेलके, प्रकाश भोसले, अजिंक्य जांभळे व तुषार झाडो यांची निवड करण्यात आली. जिल्हा समन्वयक म्हणून मयूर संकपाळ, सदस्यपदी रसिका सापते, अनिता गायकवाड, पूजा पवार, शुभदा झनझणे, आकाशी पाटील, रवींद्र मोहिते, ऋत्विकेश पवार, पिकू खिलारे, सनी जाधव, सूरज नवसे, धुळा कोळेकर व नामदेव गुरव यांची निवड करण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून अक्षय आईदे, सहप्रसिद्धी सचिव म्हणून विकास माने व रियाज अत्तार यांची निवड करण्यात आली.
या निवड प्रक्रियेला मार्गदर्शक राजेंद्र पवार, मनोहर यादव, संस्थापक संदीप मनोरे व राज्य सचिव प्रा. तायप्पा शेंडगे यांचे मार्गदर्शन लाभले. सौरभ चव्हाण यांच्या सहसचिवपदी झालेल्या निवडीमुळे शिक्षक व क्रीडा क्षेत्रातून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. शैक्षणिक, क्रीडा व संघटनात्मक कार्यातील त्यांचा सक्रिय सहभाग लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील क्रीडा व शारीरिक शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम होईल, असा विश्वास शिक्षक व क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.




