आंबेगाव:-(पुणे)-“पॅसेंजर भरण्याच्या जुन्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला; तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात”
पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहर अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) “पॅसेंजर भरण्याच्या जुन्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला; तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात”

पुणे, दि. १८ मे २०२६ : आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कात्रज चौक ते नवले ब्रिज या हायवेवरील राजमाता भुयारी मार्ग, दत्तनगर चौक परिसरात सोमवारी सकाळी सुमारे १०.१५ वाजण्याच्या दरम्यान जुन्या वादाच्या कारणातून एका रिक्षाचालकावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी फिर्यादी सुरज माणिक काळे (वय ३० वर्षे), व्यवसाय रिक्षा चालक, रा. जैन मंदिराजवळ, कात्रज, पुणे यांच्यावर दोन ते तीन वर्षांपूर्वी पॅसेंजर भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून तिघा रिक्षाचालकांनी धारदार हत्याराने हल्ला करून मारहाण केली. या हल्ल्यात सुरज काळे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फिर्यादीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी खालील आरोपींना ताब्यात घेतले आहे :
बापूसो बाळासाहेब भोसले (वय ३५ वर्षे), रा. जुनी दुगड चाळ, कात्रज, पुणे. मूळ गाव – मु.पो. विंझर, ता. वेल्हा, जि. पुणे.
गणेश हरिभाऊ धारपाले (वय २७ वर्षे), रा. गोकुळनगर, कात्रज, पुणे. मूळ गाव – धामणदेव, पोस्ट रेडुसी, ता. भोर, जि. पुणे.
गणेश उर्फ भावड्या हरिभाऊ धरपाळे (वय ३६ वर्षे), व्यवसाय रिक्षा चालक, रा. सर्व्हे नं. १६, हरिकृपा बिल्डिंग, तिसरा मजला, आंबेगाव पठार, पुणे.
आंबेगाव पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात येत आहे. जुन्या वैमनस्यातून झालेल्या या हल्ल्यामुळे कात्रज परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
2) पुणे:-भारती विद्यापीठ-
दिनांक : १६/०५/२०२६
ड्रग्स मुक्त पुण े अभियाना अंतर्गत रिक्षामधुन गांजाची विक्री करणारे रॅकेट उध्वस्त ३५ किलोग्रॅम वजनाचा गांजा व रिक्षासह सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी.

दिनांक १४/०५/२०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच े पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, सहाय्यक पोलीन निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार किरण साबळे, तुकाराम सुतार, मंगेश गायकवाड असे पेट्रोलींग करीत असताना २३.०४ वा. चिंतामणी ज्ञानपीठकडुन हायवेकडे येणारे सर्व्हस रोडवर,आंबेगाव बु, पुण े येथ े आरोपी चारुदत्त काळुराम चव्हाण, वय २५ वर्षे, धंदा रिक्षा चालक, रा.लेन नंबर २, अंगणवाडी समोर, गंगानगर, फुरसुंगी, हडपसर, पुण े हा त्याचे रिक्षामधुन २ किलोग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी घेवुन आल्याच े मिळुन आल्यान े त्यास रिक्षा व गांजासह ताब्यात घेवुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २३९/२०२६, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब)(ii)(ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास नमुद गुन्हयात अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच े वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच े मार्गदर्शनाखाली दाखल गुन्हयाचा तपास करता नमुद आरोपीकडुन लपवुन ठेवलेला ६,४५,०००/- रुपये किंमतीचा ३३ किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाच े तपासामध्ये आरोपी हे पुण े शहरामध्ये रिक्षांमधुन गांजाची वाहतुक करुन त्याची विक्री करण्याचे रॅकेट निष्पन्न झाले असुन, तसेच दोनच दिवसांपुर्वी अशा प्रकारे रिक्षामधुन गांजाच े वाहतुक करुन त्याची विक्री करणाऱ्य ा इसमावर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथ े गुन्हा दाखल करुन त्याचेकडुन देखील रिक्षा व अर्धा किलो गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. सदर दोन्ही गुन्हयाच े तपास सपोनि स्वप्निल पाटील हे करीत आहेत.
मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर यांनी ड्रग्स मुक्त पुण े अभियाना अंतर्गत अंमली पदार्थांच्या उच्चाटनासाठी दिलेल्या निर्देशानुसार परिमंडळ २ चे मा. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते सो यांच े मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनन े विशेष मोहीम राबवून अंमली पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई करुन मागील चार दिवसात एनडीपीएस कायदयांन्वये २ गुन्ह े दाखल करुन, २ आरोपी अटक करुन, त्यांचेकडुन ३५ किलोहुन अधिक वजनाचा गांजा व दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो, पुण े शहर, मा. रंजनकुमार शर्मा सो, पोलीस सह आयुक्त, पुण े शहर, मा.राजेश बनसोडे सो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते सो मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुण े यांच े मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, सपोनि स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, किरण साबळे, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, मितेश चोरमोले, निलेश खैरमोडे यांच्या पथकान े केली आहे.
(राहुल खिलारे) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, पुण े शहर




