श्रीरामपूर/ माळेवाडी:-संत तेरेजा गर्ल्स हायस्कूलचा ९५ टक्के निकाल.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

संत तेरेजा गर्ल्स हायस्कूलचा ९५ टक्के निकाल.

श्रीरामपुर / माळेवाडी ( RPS स्टार न्युज प्रतिनिधी ) श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील संत तेरेजा गर्ल्स हायस्कूलने फेब्रुवारी / मार्च २०२६ मध्ये झालेल्या एस एस सी बोर्ड परीक्षेत ९५ टक्के निकाल लावत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली विद्यालयातील गीतांजली गोविंद बडाख हिने ८६ .८० एक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला . श्रुती अशोक कार्ले हिने ८४ .४० टक्के गुणांसह द्वितीय सोनम काकासाहेब घुसाळे हिने ८२ .८० टक्के गुणांसह तृतीय आर्या शत्रुघ्न कलसाईत हिने ८२ .oo टक्के गुणांसह चतुर्थ तर शर्बरी मच्छिंद्र बोर्डे हिने ८१ .४० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला . सन १९६२ पासून हरेगाव पंचक्रोशीतील मुलींसाठी शिक्षणाचे वरदान ठरलेली हि शाळा आजही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणा बरोबरच सुसज्ज सुविधा संस्कार व प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देत आहे ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रेरित करण्याचे कार्य विद्यालय सातत्याने करत असल्याने पालकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करताना संगितले की विद्यार्थिनींच्या मेहनतीला शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभल्यामुळे हा यशस्वी निकाल शक्य झाला आहे भविष्यातही शाळा गुणवत्ता पुर्ण शिक्षणाची परंपरा कायम ठेवेल यावेळी दहावीच्या वर्गाशिक्षिका वैशाली सोज्वल तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




