कराड:-आदिशक्ती महासंघाच्या अध्यक्ष सौ. अश्विनी वेताळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनहिताच्या प्रश्नांसाठी अधिकाऱ्यांना निवेदन.
पत्रकार प्रमोद देवाडिगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

आदिशक्ती महासंघाच्या अध्यक्ष सौ. अश्विनी वेताळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनहिताच्या प्रश्नांसाठी अधिकाऱ्यांना निवेदन.

कराड परिसरातील विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा; लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन.
कराड : – आदिशक्ती महासंघाच्या अध्यक्षा सौ. अश्विनी वेताळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड परिसरातील विविध जनहिताच्या प्रश्नांबाबत संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी प्रश्नांवर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कराड तालुक्याच्या तहसीलदार, गटविकास अधिकारी (BDO), कराडचे उपनगराध्यक्ष, एसटी महामंडळाच्या व्यवस्थापक तसेच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. बैठकीत नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली.
कोल्हापूर नाका, कराड येथे महिलांसाठी स्वतंत्र शासकीय शौचालय उभारण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हा महत्त्वाचा बसथांबा असल्याने येथे दररोज महिला, विद्यार्थी व प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र शौचालयाच्या सुविधेअभावी नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच येथे सुसज्ज बसथांबा उभारण्याचीही मागणी करण्यात आली.
तसेच ओगलेवाडी येथे बसथांबा व शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
कराड बस स्थानक परिसरात पुरेशा पोलीस बंदोबस्ताचा अभाव असल्याने विविध अनुचित घटना घडत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत कोल्हापूर नाका परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी करण्यात आली. महिला, प्रवासी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करण्यात आले.
याचबरोबर कराड व परिसरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबतही निवेदन देण्यात आले. नागरिक व लहान मुलांवर कुत्र्यांच्या हल्ल्याच्या वाढत्या घटनांमुळे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
या वेळी आदिशक्ती महासंघाच्या सौ. अश्विनी वेताळ पाटील – अध्यक्षा, सौ. कृपा (उर्फ किरण) हादवे – राज्य कार्याध्यक्ष, श्री. विनोद पाटील – सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, सौ. सविता काशीद – कराड तालुका महिला अध्यक्षा, सौ. वैशाली कोरे – कराड तालुका महिला सचिव तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय सौ. पूनम बुड्डे, सौ. उमादेवी हांजी यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
यावेळी अध्यक्षा सौ. अश्विनी वेताळ पाटील यांनी “जनतेच्या प्रश्नांसाठी आदिशक्ती महासंघ सातत्याने लढा देत राहील व नागरिकांच्या हक्कासाठी संघटना कायम कटिबद्ध राहील,” असा विश्वास व्यक्त केला.




