ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी परिसरात डुकरांचा धुमाकूळ शेतकरी वैतागले.
प्रतिनिधी:- दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मायणी परिसरात डुकरांचा धुमाकूळ शेतकरी वैतागले मायणी प्रतिनिधी__सध्या मायणी परिसरात विशेषता माळीनगर परिसरात डुकरांनी धुमाकूळ घातला असून उभ्या पिकाचा ती सत्यानास करीत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे त्यामुळे या परिसरातील शेतकरी अक्षरशा वैतागले आहेत याबाबत येथील शेतकरी प्रणय बागडे व गोरख घाडगे यांनी सांगितले की एका विशिष्ट समाजाची ही डुकरे आहेत त्यांना आम्ही अनेक वेळा आम्हाला डुकरांचा त्रास होतो याचा बंदोबस्त करा म्हणून सांगितले परंतु ते त्याच्याकडे कानाडोळा करतात तात्पुरती एक-दोन दिवस त्या डुकरांना बांधून घालतात परंतु तिसऱ्या दिवशी परिस्थिती जैसे थे असते याबाबत माहिती पोलीस स्टेशनला परिसर तक्रार दाखल झाली असून पोलीस उपनिरीक्षक शितल पालकर अधिक तपास करीत आहेत