ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वर्धन ऍग्रो प्रो.लि.त्रिमली चे रोलर पुजन उत्साहात संपन्न
प्रतिनिधी :-सौरभ चव्हाण खटाव :-9503995968

*वर्धन ऍग्रो प्रो.लि.त्रिमली चे रोलर पुजन उत्साहात संपन्न* वर्धन ऍग्रो कारखान्याच्या सन २०२२-२३ च्या 6 व्या गाळप हंगामाचे मिल रोलर पुजन वर्धन ऍग्रो कारखान्याचे चेअरमन मा.श्री.धैर्यशीलदादा कदम, संचालक मा.श्री.भिमराव पाटील काका,पृथ्वीराज निकम,संतोष घाडगे,अविनाश साळुंखे,कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम यांचे शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी रहिमतपूर नगरपरिषद चे विरोधी पक्षनेते निलेश माने,कारखान्याचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या हंगामामध्ये 4 लाख मे.टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट नक्कीच गाठणार असून यासाठी कारखाण्याची सर्व यंत्रणा सज्ज आहे व पुढील काळात ती अधिकच सक्षम केली जाईल अशी ग्वाही मा. चेअरमन साहेबांनी दिली.