हवेली:-(पुणे)-“शंभर टक्के निकालाची परंपरा कायम; सरहद ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी”
पत्रकार संगीता फाळके पुणे शहर महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“शंभर टक्के निकालाची परंपरा कायम; सरहद ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी”
Sarhad Global School and Junior College च्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि. ८ मे २०२६ रोजी जाहीर झालेल्या निकालात श्रुतिका माने हिने ९५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच सुयश स्वामी याने ९४.६० टक्के, शौर्या देसाई हिने ९३.६० टक्के, कृष्णा गोमदे याने ९३.२० टक्के तर संस्कृती जगताप हिने ९२.६० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळवले.
विद्यालयातील तब्बल ४६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून २० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन, नियमित चाचणी परीक्षा आणि विषयानुसार केलेले नियोजनबद्ध मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी सक्षम करण्यासाठी चार सराव परीक्षा घेण्यात आल्या होत्या. तसेच शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मार्गदर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
शाळा व्यवस्थापन समितीचेही वेळोवेळी मोलाचे सहकार्य लाभले. सचिव सुषमा नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, शाळा व्यवस्थापक मनीषा वाडेकर तसेच मुख्याध्यापिका निर्मला नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे उज्ज्वल यश संपादन केले.
“विद्यार्थ्यांना गरज असेपर्यंत सातत्याने मार्गदर्शन करणे हेच आमच्या शाळेचे वैशिष्ट्य आहे. शिक्षक, पालक आणि व्यवस्थापन समिती यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साध्य झाली. त्यामुळेच विद्यालयाला शंभर टक्के निकालासह भरघोस यश मिळाले,” असे प्रतिपादन मुख्याध्यापिका निर्मला नलावडे यांनी केले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक व ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




