साताऱ्यात हिंदकेसरी विजेत्या थार वाहनाचे दिमाखदार पूजन…..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

साताऱ्यात हिंदकेसरी विजेत्या थार वाहनाचे दिमाखदार पूजन…..

(अजित जगताप).
सातारा दि: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या साताऱ्यातील हिंदकेसरी स्पर्धेचे आयोजन सातारा शहरात होत आहे. ही स्वागतार्य बाब असून हिंद केसरी विजेत्या थार वाहनाचे आज सातारा शासकीय विश्रामगृहात दिमाखदार पूजन करण्यात आले. यामुळे हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सातारा जिल्ह्यातील ख्यातनाम मल्य पैलवान व जावळीचे माजी सभापती व द्रोणाचार्य कुस्तीगीर पुरस्कार विजेते आदरणीय ज्येष्ठ पहेलवान साहेबराव आबाजी पवार यांच्या १०१व्या वाढदिवसानिमित्त पवार कुटुंबीयांच्या वतीने १७ लाख ५० हजार रुपये किमतीची लाल रंगाची थार वाहन क्रमांक एम एच ११ टीसी १८०६ व सात किलो वजनाची चांदीची गदा प्रथम विजेत्या हिंद केसरी विजेत्या पैलवानाला बक्षीस म्हणून भेट देण्यात येणार आहे. हे थार वाहन लाल रंगाचे असून लाल रंगाच्या मातीचाच गौरव आहे.याचबरोबर ५२ व्या अखिल भारतीय शैली कुस्ती स्पर्धा विजेत्यांना इनाम म्हणून रोख रक्कम, ढाल- शाल व ट्रॅक्टर ,बुलेट, स्कुटी याचाही समावेश असून महिला हिंदकेसरी स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल येणार आहेत. ऑलम्पिक, आशियाई, भारत केसरी, स्पर्धेत सहभागी होणारे सर्व मल्ल्यांचे नेत्र दीपक कुस्ती पाहण्यास मिळणार आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती दिन गुरुवार दि: १४ मे ते रविवार दि: १७ मे हे तीन दिवस सातारा शहरात कुस्ती दंगल म्हणून ऐतिहासिक नोंद घेणारी ठरणार आहे. अशी माहिती राजेश्वरी प्रतिष्ठानचे दीपक साहेबराव पवार, सुधीर साहेबराव पवार त्याचबरोबर अखिल भारतीय शैली कुस्ती महासंघाचे सचिव गौरव रोशनलाल, ऑलिंपिक कुस्तीगीर अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल्य ग्यानसिंग यांनी दिले आहे.
या वेळेला नव्या पिढीतील पैलवान राजेश्वर पवार, चंद्रकांत सूळ, आबा सूळ, माणिक पैलवान यांच्यासह पत्रकार विशाल कदम अजित जगताप व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभिक भारतीय पद्धतीने थार वाहनाचे पूजन करण्यात आले. हिंदकेसरी स्पर्धेतील विजेत्या महाराष्ट्रातील विजेत्यांना साताऱ्यात तर हरियाणा, पंजाब, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व इतर राज्यातून आलेल्या विजेत्यांना त्यांच्या राज्यात थार वाहन देण्याची व्यवस्था महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापक स्वराज यांनी केली. अशी माहिती देण्यात आलेली आहे.भारत देशातील कुस्तीप्रेमी २८ राज्यातील तसेच वायु दल, सेना दल, स्थल दल, सीमा सुरक्षा दल, औद्योगिक सुरक्षा दल, भारत तिबेट सीमा सुरक्षा दल अशा अनेक खाजगी व शासकीय सेवेतील नामांकित मल्ल भाग घेणार आहेत. ही नेत्रदीपक कुस्ती बघण्याचे भाग्य सातारकरांना लाभणार आहे. या स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ऑलम्पिक कुस्तीतील पहिले पदक मिळवणारे सातारचे सुपुत्र पैलवान खाशाबा जाधव यांच्या भूमीत होणाऱ्या या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेमुळे पुन्हा एकदा सातारच्या क्रीडा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हिंदकेसरी विजेते ठरण्यासाठी देशभरातील अनेक तालीम मैदानात सध्या अनेक मूल्य कुस्तीचे प्रात्यक्षिक व सहभागी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत. तसेच १०१ व्या वाढदिवसानिमित्त आदरणीय ज्येष्ठ पहेलवान साहेबराव आबाजी पवार यांना आतापासूनच अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.




