आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

झांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) झांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …

(अजित जगताप)

लडाख दि: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी व घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश भूमी असलेल्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र ओमकार राजेंद्र गुंडगे हे लडाख राज्यातील झांस्करचे पहिले जिल्हाधिकारी बनले आहेत. दुष्काळी दहिवडी तालुक्यातील आय.ए.एस. अधिकारी श्री गुंडगे यांनी खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्याचे नाव देशभर उज्वल केले आहे. या ठिकाणी

पोलीस अधीक्षक म्हणून श्री
रिग्झेन संदुप यांचीही नियुक्ती झाली आहे.

लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी २८ एप्रिल २०२६ रोजी झांस्करसह ५ नवीन जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या नियुक्त्या मंजूर केल्या.

नूतन जिल्हाधिकारी ओंकार राजेंद्र गुंडगे या आधी झांस्करचे उपविभागीय अधिकारी होते. २०२२ साली यूपीएससी परीक्षा पास होऊन त्यांनी ३८० वा क्रमांक मिळवला होता. अँथ्रोपोलॉजी विषय त्यांनी घेतला होता. भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेसाठी ते दिल्लीमध्ये थांबले होते. माण तालुक्यातील म्हसवड मेरी माता इंग्लिश स्कूल मिडीयम, मुंबई येथील रुईया कॉलेज, पुणे येथील आयएलएम लॉ कॉलेज या ठिकाणी त्यांनी शिक्षण पूर्ण केले. पुणे विद्यापीठाच्या व्हॉलीबॉल संघाचे ते कर्णधार होते. जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न अखेर साकार झाले आहे.
.लडाख हा भारताचा एक राज्य नसून केंद्रशासित प्रदेश आहे, ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधून वेगळा करून ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी अधिकृतपणे लडाख केंद्रशासित प्रदेश झाला. लेह ही राजधानी आहे. लडाखी, तिबेटी, शीणा, बलती, पुरिकी, उर्दू भाषा बोलली जातात. जागतिक पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात.

लडाख भारतीय उपखंडाच्या उत्तर भागात काराकोरम पर्वतरांगांच्या आसपास आहे. शेजारी तिबेट, लाहोल, स्पिती ,जम्मू कश्मीर पाकिस्तान गिलगिट,काराकोरम खिंड व चीन आजूबाजूला आहे.- हा प्रदेश सियाचीन हिमनदीपासून मुख्य ग्रेट हिमालयापर्यंत पसरला आहे. भारतातील सर्वात उंच पठार लडाख पठार येथेच आहे. येथे अनेक सुंदर बौद्ध मठ आहेत. स्पितुक गुहा हा टेकडीवरचा मठ प्रसिद्ध आहे. येथील भिक्षू ४०० किमी पदयात्रा काढून कचरा वेचतात.
जगभरातील गिर्यारोहक व पर्यटक या ठिकाणी भेट देतात त्यामुळे मोठी जबाबदारी जिल्हाधिकारी म्हणून श्री गुंडगे यांच्यावर आहे.पँगॉन्ग तलाव,लेह पॅलेस,खारदुंगला खिंड सियाचीन, गुरुद्वारा पत्थर साहिब,नुब्रा घाटी,इंदू व झंकार नदीच्या संगमावर रिव्हर राफ्टिंग उन्हाळ्यात लोकप्रिय आहे. दहिवडी येथील सुप्रसिद्ध कापड व्यापारी राजेंद्र गुंडगे यांचे चिरंजीव व सातारा जिल्हा परिषद माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती एडवोकेट भास्करराव गुडघे यांचे ते पुतणे आहेत. या यशाने संपूर्ण सातारा जिल्ह्याची शान व मान उंचावली आहे. अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
लडाखमधील प्रशासकीय संरचना मजबूत करण्यासाठी ऑगस्ट २०२४ मध्ये ५ नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीला मंजुरी देण्यात आली. त्यात नुब्रा, शाम, चांगथांग, झाँस्कर आणि द्रास यांचा समावेश आहे. या निर्णयानंतर लडाखमधील एकूण जिल्ह्यांची संख्या २ वरून ७ झाली आहे. यापूर्वी झाँस्कर हा कारगिल जिल्ह्याचा एक भाग होता.

2) साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी, अननस खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी.

(अजित जगताप)
सातारा दि: उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. त्याचा जीवनमान व आहारावर मोठा परिणाम
झाला आहे. यामुळे आता लोकांना आरोग्यदायक फळ खाल्ल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे आरोग्यवर्धक अननस फळाला आता मोठी मागणी असून सातारा जुना आर.टी.ओ. कार्यालय चौकातच झाडाच्या सावलीमध्ये शेजारी अननस घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. दररोज किमान ३०० ते ४०० नग अननसचे विक्री होत असल्याची माहिती श्री प्रभू व सलमान बागवान यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यात कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात अननस दाखल झालेले आहेत. अननसच्या गुणवत्तेनुसार पन्नास रुपये ते दोनशे रुपये अननस विक्री होत आहे. थंड बर्फावर अननस ठेवल्यास एक फोड दहा ते वीस रुपयाला मिळते.अननस हे केवळ चविष्ट नसून आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी उष्णकटिबंधीय फळ आहे. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि विशेष एन्झाइम्स असतात.
अननसात ‘ब्रोमेलेन’ नावाचे एन्झाइम असते, जे प्रथिने तोडण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठता आणि पोटाची सूज कमी करण्यास उपयुक्त आहे.
हे व्हिटॅमिन ‘सी’ चा उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संसर्गाशी लढण्यास मदत होते.
व्हिटॅमिन ‘सी’ आणि अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेला उजाळा मिळतो आणि मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत होते.
अननसातील अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.अननस जास्त आम्लधर्मी असू शकते, त्यामुळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास छातीत जळजळ होऊ शकते. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी हे फळ मर्यादित प्रमाणात खावे किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानेच घ्यावे असे सांगण्यात आले आहे. आंब्याची फोड लागते गोड असे म्हणतात त्याप्रमाणे गरिबांचे आंबे म्हणून अननस सध्या अनेकांच्या आहारामध्ये मुख्य सूत्र ठरले आहे. विटा सोबत आणूनच खाल्ल्यास त्याची चव दिवसभर जिभेवर रेंगाळत असते. अशी माहिती नियमितपणाने अननस खाणारे संजय कदम, सूर्यकांत पाटणकर व दत्ता पवार यांनी दिली.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button