मायणी:-स्पंदन-2026 फाईन आर्ट्स स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी एजुकेशन सोसायटी च्या विद्यार्थ्यांचे यश.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

स्पंदन-2026 फाईन आर्ट्स स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी एजुकेशन सोसायटी च्या विद्यार्थ्यांचे यश.

मायणी येथील रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटर अँड हॉस्पीटल महाराष्ट्र,युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस(MUHS) संलग्न संस्थेच्या विद्यार्थ्यांनी ढोले पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे आयोजित ‘स्पंदन-2026’ या स्पर्धेत ‘फाईन आर्ट्स – इंस्टॉलेशन’ या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून संस्थेचा गौरव वाढवला आहे.
कौस्तुभ पाटील, प्रशांत सूर्यवंशी, सुजित वाघमोडे आणि ओंकार मोरे या विद्यार्थ्यांच्या टीमने उत्कृष्ट सर्जनशीलता, नावीन्यपूर्ण विचारसरणी आणि कलात्मक कौशल्याचे प्रभावी सादरीकरण करत हा मान पटकावला. त्यांच्या संकल्पनेत कलात्मक दृष्टीकोनाबरोबरच सामाजिक जाणीवांचा प्रभावी संगम दिसून आला, ज्यामुळे परीक्षक आणि प्रेक्षकांकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
या स्पर्धेत अनेक नामांकित महाविद्यालयांचा सहभाग असल्याने स्पर्धा अत्यंत चुरशीची होती रीही विद्यार्थ्यांनी आपल्या वेगळेपणाने, संघभावनेने आणि प्रभावी सादरीकरणाने ठसा उमटवला.
या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ. अमित पवार तसेच संचालक संदीप देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या परिश्रम, सर्जनशीलता आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे त्यांनी कौतुक करत, MUHS अंतर्गत संस्थेच्या गुणवत्तेचा आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनाचा उल्लेख केला. तसेच सर्व प्राध्यापकांनीही विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे संस्थेच्या लौकिकात आणखी भर पडली असून विद्यार्थ्यांसाठी हे प्रेरणादायी ठरत आहे.




