आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड:-मा.संजय बदीयानी यांची यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई ट्रस्टवर आजीव सदस्यपदी निवड.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मा.संजय बदीयानी यांची यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई ट्रस्टवर आजीव सदस्यपदी निवड.

सातारा प्रतिनिधी विनोद पाटील
कराड :- श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट, कराडचे खजिनदार मा. श्री. संजय बदीयानी यांची मा. खासदार श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या ट्रस्टवर आजीव सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा कराड येथे उत्साहात सत्कार करण्यात आला.
श्री शिवाजी विद्यालय, कराड येथे आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष व सचिव मा. श्री. जयंतकाका पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्री. बदीयानी यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संचालक मा. श्री. संभाजीराव सुर्वे, श्री शिवाजी विद्यालय, कराडचे मुख्याध्यापक श्री. टी. डी. जाधव तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी श्री. संजय बदीयानी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.




