आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-श्री.रामकृष्ण विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज चा सार्थक साळुंखे चमकला; राष्ट्रीय शिष्यवृत्तीमध्ये जिल्ह्यात ९ वा क्रमांक.

पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्री.रामकृष्ण विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज चा सार्थक साळुंखे चमकला; राष्ट्रीय शिष्यवृत्तीमध्ये जिल्ह्यात ९ वा क्रमांक.

सातारा : सातारा जिल्ह्यात नागठाणे गावचे श्री.रामकृष्ण विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज शाळेतील कु. सार्थक मनोज साळुंखे याने राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत जिल्ह्यात ९ वा क्रमांक पटकावला असुन कु.अर्णव महेश क्षीरसागर २२ वा क्रमांक व मुलींमधून कुमारी श्रावणी विजय बागल ३० वा क्रमांक पटकावल्याने श्री.रामकृष्ण विद्यामंदिर शाळेचे नाव उंचावले असून हे विद्यार्थी अत्यंत जिद्द, मेहनत आणि नियोजनबद्ध अभ्यासाच्या जोरावर त्याने ही यशस्वी कामगिरी साध्य केली आहे.
यांच्या यशामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, त्याच्या कुटुंबीयांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. शशिकांत काटे सर, सर्व शिक्षकवर्ग, पालक व ग्रामस्थांनी त्याचे कौतुक करत हार्दिक अभिनंदन केले.
यावेळी शिक्षकांनी सांगितले की, सुरुवातीपासूनच अभ्यासू, शिस्तप्रिय व जिज्ञासू विद्यार्थी असून त्याच्या यशामागे सातत्यपूर्ण मेहनत आणि योग्य मार्गदर्शन आहे. त्याच्या या कामगिरीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.
या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button