कराड:-आदिशक्ती महासंघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची कराड येथे घोषणा.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कराड:-आदिशक्ती महासंघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची कराड येथे घोषणा.

कराड :- दि. 19 एप्रिल 2026 रोजी आदिशक्ती महासंघाच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा कराड येथील गेस्ट हाऊस येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. यापूर्वी सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वर्गीय महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले.

या प्रसंगी आदिशक्ती महासंघाच्या अध्यक्षा अश्विनीताई वेताळ- पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा केली तसेच महासंघाच्या कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी, सामाजिक न्यायासाठी आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी महासंघ कटिबद्ध असल्याचे सांगितले.
*या वेळी घोषित करण्यात आलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे :*
सौ. कृपा (उर्फ किरण) हादवे – राज्य कार्याध्यक्ष
श्री. विनोद पाटील – सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य
सौ. श्रद्धा शिंदे – महिला अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य
सौ. सुनंदा शहा – सांगली जिल्हा महिला अध्यक्षा
सौ. वृषाली रामदास तुंबडे – नाशिक जिल्हा महिला अध्यक्षा
सौ. संध्या मदने – रत्नागिरी जिल्हा महिला उपाध्यक्ष
सौ. सविता काशीद – कराड तालुका महिला अध्यक्षा
सौ. वैशाली कोरे – कराड तालुका महिला सचिव
कार्यक्रमात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून समाजसेवा, महिला सक्षमीकरण आणि विविध जनजागृती उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमामुळे आदिशक्ती महासंघाच्या कार्याला नवी दिशा मिळणार असून, राज्यभर संघटनेचे जाळे अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.




