ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साताऱ्यात बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात मिशी काढून निषेध…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

साताऱ्यात बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात मिशी काढून निषेध…

सातारा दि: क्रांतिकारी जिल्हा अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये अनेक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी होऊन गेलेले आहेत. काही सध्या कार्यरत सुद्धा आहेत. ही अभिमानाची गोष्ट म्हणजे देशासाठी शहीद झालेले अशोक कामटे हे सातारचे पोलीस अधीक्षक होते. त्याचबरोबर सातारचे सुपुत्र व दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडणारे शहीद पोलीस हवालदार तुकाराम ओंबळे हे सुद्धा सातारचे सुपुत्र आहेत. अशा या सातारा जिल्ह्यात एका पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली नंतर त्यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कांबळे गटाचे जयवंत शिवदास कांबळे यांनी निषेध नोंदवण्यासाठी स्वतःचे मिशी काढली आहे. याची संपूर्ण सातारा शहरात चर्चा सुरू झालेली आहे.
गेली वर्षभरापासून शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे. त्या अधिकाऱ्याची विभाग खाते मार्फत चौकशी करावी. तसे न केल्यास आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दिलेला आहे. सध्या या पोलीस अधिकाऱ्याची सातारा शहर पोलीस ठाण्यात बदली झालेली आहे. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर त्यांच्या कार्याचे कौतुक व त्यांना प्रेरणा देण्यासाठी स्वागत व पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा दिल्या जातात. मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते व संघटना त्यांच्या कार्यालयात गर्दी करतात. परंतु, सातारा जिल्ह्यात सातारा शहर पोलीस ठाण्यात बदली झालेल्या अधिकाऱ्याचा निषेध म्हणून स्थानिक नागरिकांनी मिशी काढण्याचा प्रकार घडल्यामुळे खळबळ माजली आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच भर कडक उन्हात श्री जयवंत कांबळे यांनी स्वतःचीच कारागीरा मार्फत मिशी काढलेली आहे. याबाबत आता संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करणार का? त्यांच्या चांगल्या कामाची नोंद घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. याबाबतचे निवेदन सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व सातारा शहर पोलीस ठाण्यात देण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते श्री कांबळे यांनी भिशी काढण्याचा प्रकार नेमका कोणत्या कारणासाठी केला आहे? याची आता जनतेला उत्सुकता लागली आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button