श्रीरामपूर:-अगोदर आकारी पडीत जमिन मोजणी नंतर उद्योग – ना चंद्रशेखर बावनकुळे
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

अगोदर आकारी पडीत जमिन मोजणी नंतर उद्योग – ना चंद्रशेखर बावनकुळे

श्रीरामपुर ( RPs स्टार न्युज प्रतिनिधी ) आकारी पडीत शेतकऱ्यांची जमीन वारसांना परत करण्यासंदर्भात जमीन वारसांना परत करण्यासंदर्भात आज बुधवार दि २२ रोजी पालकमंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलमंत्री ना . चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात एक तास संपन्न झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली ॲड अजित काळे शेती महामंडळाचे कार्यकारी अन्य वरिष्ठ अधिकारी , भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर , तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे , याचिकाकर्ते गिरीधर आसने , माजी सभापती उपजिल्हाध्यक्ष दिपक पटारे , डॉ शंकर मुठे , भिम भाऊ बांद्रे , पत्रकार भाऊसाहेब काळे , सरपंच सागर मुठे , सचिन वेताळ , शरद आसने पोलीस पाटील दत्तात्रय मुठे , अमोल मुठे , जालिंदर मुठे , गोकुळ मुठे , यांच्यासह नऊ गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते
या बैठकीत ना बावनकुळे म्हणाले की पहिले आकारी पडीत शेतकरी बांधवांना जमीन मोजणी करून देवू नंतर राहिलेली जमीन उद्योगासाठी देण्यात येईल असा या बैठकीचा वृत्तांत मिळाला आहे




