कराड:-म्हासोलीच्या आखाड्यात कुस्तीचा महाथरार! १ लाख १ हजारांच्या इनामासाठी खोतकर–सुळ आमनेसामने.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

म्हासोलीच्या आखाड्यात कुस्तीचा महाथरार!
१ लाख १ हजारांच्या इनामासाठी खोतकर–सुळ आमनेसामने.

सातारा प्रतिनिधी सारिका गवते
कराड दि. २१ : कराड तालुक्यातील पाटीलवाडी (म्हासोली) येथे श्री जुगाई देवी यात्रेनिमित्त आज, मंगळवार दि. २१ एप्रिल २०२६ रोजी जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले असून, या मैदानात महाराष्ट्रातील नामांकित मल्लांच्या लढतींनी कुस्तीप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे.
या भव्य मैदानाचे प्रमुख आकर्षण ठरणारी प्रथम क्रमांकाची कुस्ती तब्बल १ लाख १ हजार रुपयांच्या इनामासाठी रंगणार असून,
पै. सुदर्शन खोतकर (शिवरामदादा कुस्ती केंद्र, पुणे)
🆚 पै. विकास सुळ (मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र, पुणे/सातारा)
यांच्यात जोरदार भिडंत होणार आहे. ही कुस्ती उद्योजक राजकुमार शेवाळे यांच्या वतीने कै. शांताबाई व कै. नामदेव मारुती शेवाळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लावण्यात आली आहे.
🏆 प्रमुख कुस्त्यांची रंगतदार लढत
द्वितीय क्रमांक (₹५०,०००/-)
पै. आण्णा पाटील (म्हासोली) 🆚 पै. आदित्य पाटील (छत्रपती शिवाजी आखाडा, कराड/कोल्हापूर)
(कै. कॅप्टन वसंतराव पाटील यांच्या स्मरणार्थ)
तृतीय क्रमांक (₹५०,०००/-)
पै. अक्षय मोहिते 🆚 पै. आकाश रानवडे (पुणे)
(कै. हरिबा पाटील यांच्या स्मरणार्थ)
चतुर्थ क्रमांक (₹३५,०००/-)
पै. विकी थोरात (औंध) 🆚 पै. सुजित भगत (पुणे)
या मैदानाचे धावते समालोचन प्रसिद्ध निवेदक पै. सुरेश जाधव (चिंचोली) करणार असून, पै. आकाश तडाखे यांच्या हलगीच्या तालावर आखाड्यातील वातावरण आणखी रंगणार आहे. तसेच, पुतळिया YouTube चॅनल मार्फत या कुस्त्यांचे थेट प्रक्षेपणही होणार आहे.
याशिवाय ५० हून अधिक लढतींमध्ये साहिल पोळ, अतुल काळे, अधर्य पवार, शुभम पाटील, रणजित मंडले यांसारखे उदयोन्मुख आणि दिग्गज मल्ल आपली ताकद आजमावणार आहेत.
🪔 यात्रेचा सविस्तर कार्यक्रम
📅 सोमवार, २० एप्रिल
देवीचा नैवेद्य
सायं. ७ ते ११ : सासन काठ्यांचे आगमन
📅 मंगळवार, २१ एप्रिल
सकाळी ६ ते ९:३० : पालखी मिरवणूक व छबीना
सकाळी ९:३० ते ११ : दंडस्थान
सकाळी ११ ते दुपारी ३ : सुदाम साठे म्हासोलीकर यांचा लोकनाट्य तमाशा
दुपारी ३:३० ते ७:३० : भव्य कुस्त्यांचे मैदान
श्री जुगाई देवी यात्रा कमेटी (म्हासोली परिसर) यांच्या वतीने सर्व कुस्तीप्रेमींनी या जंगी आखाड्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




