सातारा:-नागठाणे येथे महाराजस्वी अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

नागठाणे येथे महाराजस्वी अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

सातारा:- नागठाणे नगरी येथे मंडल अधिकारी आणि महाराष्ट्र प्रशासन तलाठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराजस्वी अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानामध्ये नागरिकांना महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच सातबारा, फेरफार, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला आदी शासकीय कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या अभियाना मध्ये सर्व सह जातील तलाठी अधिकारी कृषी अधिकारी भूमी अभिलेख बांधकाम आणि रेशनिंग विभाग यांच्या वतीने सर्व सामान्य जनतेची कामे करण्यात आली ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्या साठी सातारा तालुका तहसीलदार श्री समीर यादव, नायब तहसीलदार श्री.कोळेकर साहेब, कराड उत्तरचे आमदार श्री.मनोज दादा घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य श्री.अजित साळुंखे, पंचायत समिती उपसभापती जाधव मॅडम नागठाणे गटाचे पंचायत समितीचे विद्यमान सदस्य श्री.संतोष लक्ष्मण साळुंखे पाटील. सदर कार्यक्रमास सर्व शासकीय विभागाचे अधिकारी पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
अभियानादरम्यान नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावपातळीवर शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले.
या अभियानामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज कमी झाली असून प्रशासनाबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे.




