आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-“महर्षी कर्वे जयंतीनिमित्त वाईत रक्तदानाचा महासाद — १०० दात्यांनी दिला जीवनाचा श्वास!”

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-“महर्षी कर्वे जयंतीनिमित्त वाईत रक्तदानाचा महासाद — १०० दात्यांनी दिला जीवनाचा श्वास!”

 सातारा प्रतिनिधी सारिका गवते

वाई, दि. १७ एप्रिल २०२६ : महर्षी अण्णा कर्वे यांच्या जयंतीनिमित्त वाईत समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श पाहायला मिळाला. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने, वाई प्रकल्प आणि माऊली ब्लड सेंटर सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात पार पडले.
“ज्ञानाचा प्रकाश, मानवतेचा सुवास – रक्तदानातून जपूया नव्या जीवनाचा श्वास!” या प्रभावी घोषवाक्याखाली सत्यवती जोशी सभागृह, कन्या शाळा, वाई येथे शुक्रवारी (दि. १७) सकाळी १० ते दुपारी २.३० या वेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिक, पालक तसेच युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीची जाणीव दाखवून दिली.
या कार्यक्रमास वाई नगराध्यक्ष मा. अनिल सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाई प्रकल्पाच्या अध्यक्षा उमाताई जोशी होत्या. तसेच गिरीश पेंढारकर, डॉ. रमणलाल भट्टड, मकरंद मुळे, केतकी पाटणे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.
माऊली ब्लड सेंटरच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने रक्तसंकलन प्रक्रिया अत्यंत सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली. प्रत्येक रक्तदात्याची काळजीपूर्वक तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देत सन्मानित करण्यात आले.
या शिबिरात तब्बल १०० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत अनेक गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण निर्माण केला. समाजात रक्तदानाबाबत जनजागृती घडवून आणत मानवतेचा संदेश अधिक बळकट करणारा हा उपक्रम ठरला.
आयोजकांनी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, वाईकरांच्या सामाजिक जाणीवेचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button