वाई सोनगीर वाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी.
पत्रकार रेखा येवले सातारा जिल्हा महिला उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई सोनगीर वाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी.

सातारा प्रतिनिधी रेखा येवले
अखिल सोनगिरवाडी मंडळ यांनी वाई तालुक्यातून जाणाऱ्या सर्व ज्योती व मावळे यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले त्याचप्रमाणे हळदीकुंकू समारंभ, मल्लखांब, लाठी काठी, शिवगर्जना, पोवाडा इत्यादी पारंपारिक कार्यक्रम घेतले आणि पुढील पिढी समोर शिवजयंती साजरी कशी करायची याबद्दल उत्तम उदाहरण ठेवले या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर नगराध्यक्ष श्री अनिल सावंत जी तसेच पोलीस स्टेशन मधील अधिकारी आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले
या मंडळांनी असे पारंपारिक कार्यक्रम घेऊन खूप छान विचार मांडले आहेत आणि याच कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांना खरा मानाचा मुजरा केला आहे
या कार्यक्रमाचे रूपरेषा श्री गिरीधर आप्पा मालुसरे, सौ नूतन गिरीधर मालुसरे (नगरसेविका ), श्री मिथुन शांताराम कदम, सौ मीना मिथुन कदम यांनी केली आहे
अशा रीतीने संपूर्ण कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला आहे.




