आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-किसन वीर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई दि.18
किसन वीर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा.

जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात मराठी, राज्यशास्त्र, ग्रंथालय विभाग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि स्थायी समिती विशेष कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने शासन परिपत्रकानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानिमित्त महाविद्यालयात शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकणारे प्रा. रमेश डुबल, सदस्य, जनता शिक्षण संस्था, वाई यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
महाविद्यालय परिसर स्वच्छता अभियान, विद्यार्थ्यांसाठी सलग १२ तास वाचन व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन इ. उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आले.
सलग १२ तास या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विविध विषयांवरील वाचनाचे महत्व अधोरेखित केले. वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकास होतो आणि समाजाकडे पाहण्याची दृष्टी विकसित होते, असेही त्यांनी सांगितले.
मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे असे सांगून, वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले. उपप्राचार्य प्रा. डॉ. विनोद वीर यांनी या उपक्रमाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
तद्नंतर प्रयोगशाळा परिचर श्री. अनिल लाखे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून सप्ताहाचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संयोजन डॉ. अमोल कवडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. शिवाजी कांबळे, डॉ. शिवाजी ताटे, सहा. प्राध्यापक राजेंद्र जायकर, प्रसिद्धी समितीचे समन्वयक डॉ . संग्राम थोरात, सहा. प्राध्यापक जितेंद्र चव्हाण, कार्यालयीन अधीक्षक बाळासाहेब टेमकर तसेच विशाल महांगडे व सुनील जंगम यांनी विशेष परिश्रम घेतले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button