श्रीरामपूर:-अहिल्यानगरच्या चार अग्निशमन जवानांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर i केंद्र सरकारने घेतली शौर्याची दखल.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

अहिल्यानगरच्या चार अग्निशमन जवानांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर i केंद्र सरकारने घेतली शौर्याची दखल.

श्रीरामपूर प्रतिनिधी संजय पगारे
श्रीरामपुर / माळेवाडी ( RPs स्टार न्युज प्रतिनिधी ) अग्निशमन सेवा सप्ताह २०२६ निमित्त भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने राष्ट्रीय स्तरावरील शौर्य पुरस्कार जाहीर केले असून यामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील चार जवानांनी मानाचे स्थान पटकावले आहे १3 एप्रिल 2026 रोजी नवी दिल्ली येथील मुख्यालयातून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार , मुख्य अग्निशमन अधिकारी शंकर मिसाळ , चाचक चिंधू भांगरे आणि मदतनीस भरत पडगे व रवींद्र साठे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे महाराष्ट्रातील एकूण २८ कर्मचाऱ्यांमध्ये अहिल्यानगरच्या या जवानाचा समावेश आहे आपत्कालीन परिस्थितीत स्वतःच्या जीवाची परवा न करता नागरिकांचे प्राण वाचवले आणि सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल केंद्र सरकारने घेतली आहे या जवानांना कांस्य पदक आणि प्रशंसा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असून या यशामुळे महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला गेला असल्याची भावना आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केली आहे




