ओझर्डे-(वाई):-एनसीएमसी कार्ड योजनेला नागरिकांचा प्रतिसाद.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

ओझर्डे-(वाई):-एनसीएमसी कार्ड योजनेला नागरिकांचा प्रतिसाद.

सातारा तालुका प्रतिनिधी महेश मोहिते
सातारा:-वाई तालुक्यात वसलेले छोटेसे गाव म्हणजे ओझर्डे या गावी राजधानी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली एस टी प्रवास सवलती साठी NCMC स्मार्ट कार्ड काढण्याचा कॅम्प राजधानी मराठी पत्रकार संघाचे राज्य सचिव श्री.चेतन भोसले यांनी आयोजित करण्यात आला प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा व्हाव म्हणून देशभरात “वन नेशन, वन कार्ड” संकल्पनेअंतर्गत सुरू करण्यात आलेले NCMC म्हणजेच National Common Mobilitby Card आता सार्वजनिक वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. या कार्डच्या माध्यमातून बस, मेट्रो, पार्किंग, टोल आणि किरकोळ खरेदीसाठी एकाच कार्डचा वापर करता येतो.
महाराष्ट्रातही एसटी प्रवाशांसाठी NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली असून सवलतीच्या प्रवाशांसाठी हे कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवासी यांना या कार्डमुळे अधिक पारदर्शक आणि सुलभ सेवा मिळणार आहे. असे राज्याचे सचिव चेतन भोसले यांनी या योजने मार्फत दाखवून दिले तसेच NCMC कार्डमुळे रोख व्यवहार कमी होतील, तिकीट काढण्यासाठी लागणारा वेळ वाचेल आणि डिजिटल पेमेंटला चालना मिळेल. हे NCMC कार्डचे महत्व ओझर्डे गावातील लोकांना पटवून दिले




