क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

परेल:(मुंबई)-स्नेहमिलन आणि मैत्रीचा पर्वणी सोहळा: लक्ष्मी कराओके स्टुडिओ!

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

परेल:(मुंबई)-स्नेहमिलन आणि मैत्रीचा पर्वणी सोहळा: लक्ष्मी कराओके स्टुडिओ!

“मैत्री म्हणजे शब्दांशिवाय समजणारा संवाद आणि संकटात पाठीशी उभा राहणारा एक भक्कम आधार!”

मुंबई, परेल (प्रतिनिधी)
​आज ‘ फ्रेंडशिप डे’ च्या निमित्ताने लक्ष्मी कराओके स्टुडिओ मध्ये रंगलेला मैत्रीचा सोहळा म्हणजे केवळ गाण्यांचा कार्यक्रम नव्हता, तर तो आमच्या गोड कुटुंबाचा एक सुंदर प्रवास होता. आजच्या या विशेष दिवशी फक्त आणि फक्त मैत्रीदिनाची गीते गाऊन सर्व गायकांनी या सुंदर दिवसाला एक वेगळाच उजाळा दिला! आमचे लाडके डॉ. मंगेश भाऊ (जे समाजसेवा आणि मैत्रीचे जिवंत प्रतीक आहेत) यांनी दोन विशेष मैत्रीचे केक आणून या दिवसाची गोडी अधिकच वाढवली. त्याबद्दल लक्ष्मी कराओके स्टुडिओच्या वतीने मनापासून आभार! या सोहळ्यात आमचे स्टुडिओचे आधारस्तंभ श्री. रामजी दादा आणि सौ. लक्ष्मी भाभी यांच्या हस्ते डॉ मंगेश भाऊ यांनी आणलेला केक कापून सर्व गायकांचे तोंड गोड करण्यात आले. त्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे आणि प्रेमळ आतिथ्यामुळे हा संपूर्ण मैत्री सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात पार पडला, ज्याचे संपूर्ण श्रेय या दिलदार जोडीला जाते.तसेच सुरेल आवाजाची जादू पसरवणारे आमचे सर्व गायक-गायिका मित्र​विजय भाऊ, शैलेश भाऊ, तुषार भाऊ, बाबू, पांडुरंग भाऊ, दिनेश, निमेश, दत्ता, पूजा वहिनी, निशा ताई, विनोद…​तसेच सर्वांचे लाडके आबा पवार, तावडे साहेब, छोटे उस्ताद वरद आणि उपस्थित सर्व प्रतिष्ठित कलाकार ​या सर्वांच्या साथीने आणि गायकीने हा सोहळा खऱ्या अर्थाने उजळून निघाला. (अनावधानाने कुणाचे नाव राहिल्यास क्षमस्व!) आजच्या या आनंदाच्या क्षणी आमचे साउंड इंजिनिअर काफिल भाई, तसेच हसमुख, अर्चना ताई, निलेश, शारदा ताई, रुची, अशोक दादा, निवेदिका लता आणि इतर सर्व मित्रमंडळींची उणीव प्रकर्षाने जाणवली; पण प्रत्येकाच्या मनातली आपुलकी कायम सोबत होती! ​प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा तो आपसूक आनंद आणि संगीताची ही जोड म्हणजेच आमची खरी संपत्ती.

​”मिळाल्या अशा मैफिलीत
जिथे सुरांनाही स्पंदने लाभली,
लक्ष्मी स्टुडिओच्या अंगणात
मैत्रीची नवी पहाट झाली!”

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button