ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोलापूर:-‘आरक्षणा’बाबत सायबर पोलिस अँक्शन मोडवर 20 दिवसांत सोशल मीडियावरील 107 आक्षेपार्ह पोस्ट हटविल्या-पोलीस उपायुक्त डॉ.अश्विनी पाटील यांनी दिली माहिती!

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सोलापूर:-‘आरक्षणा’बाबत सायबर पोलिस अँक्शन मोडवर 20 दिवसांत सोशल मीडियावरील 107 आक्षेपार्ह पोस्ट हटविल्या-पोलीस उपायुक्त डॉ.अश्विनी पाटील यांनी दिली माहिती!

(सोलापूर जिल्हा)

अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मुद्द्यावरून मोर्चे निघत आहेत. या पार्श्वभूमीवर काही लोक समाजात जातीय तेढ निर्माण व्हावी म्हणून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकू लागले आहेत. यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची सायबर पोलीस आता अँक्शन मोडवर आहेत. सोलापूरांत 20 दिवसांत सायबर पोलिसांनी वेगवेगळ्या 107 सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट पोस्ट हटविल्या असल्याची माहिती पोलिस उप आयुक्त डॉ. अश्विनी जगताप यांनी नुकतीच प्रसार माध्यमांना दिली आहे.
आरक्षणाचे उपवर्गीकरण म्हणजे एकाच आरक्षित प्रवर्गातील सर्व जातींना समान लाभ
मिळत नसल्यास, त्यातील अधिक मागासलेल्या जातींसाठी स्वतंत्र कोटा किंवा गट तयार करणे होय. मंगळवारी (ता. २८) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात बैठक झाली. अनेकांनी आरक्षणाच्या उपवर्गीरकणातून तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली. त्यानुसार सायबर पोलिसांची टीम आक्षेपार्ह पोस्टवर लक्ष ठेवून आहे. ते एआयचा वापर करत आहेत. आक्षेपार्ह पोस्ट पडल्यास त्याचे नोटिफिकेशन पोलिसांना मिळते, ज्यामुळे पोस्ट हटविणे सोयीचे होते.
*५ वर्षे शिक्षा अन् १० लाख दंड*
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कलम १५३ अ (तेढ निर्माण करणे), कलम ३५३ (अफवा, अशांतता पसरवणे) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ (अश्लील मजकूर प्रसारित करणे) नुसार गुन्हा दाखल होतो. गुन्ह्यानुसार ३ ते ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड होतो. पहिल्यांदा दोषी आढळल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ५ लाखांपर्यंत दंड आणि पुन्हा गुन्हा केल्यास ५ वर्षे शिक्षा, १० लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, प्रसारित करणे गुन्हा आहे. गुन्हा दाखल झाल्यास ना नोकरी ना पासपोर्ट मिळतो. तरुणांनी खबरदारी घ्यावी. सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडेल, अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकू नयेत. कोणाला आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास त्यांनी ती पोस्ट (युआरएल लिंकसह) सायबर पोलिसांना पाठवावी, त्यानुसार त्या
पोस्ट हटवून संबंधितांवर कारवाई केली जाणार असे थेट आवाहन सोलापूरच्या पोलीस उप आयुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी स्पष्ट सांगितले आहे‌.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button