धोम:-(वाई)-“शिक्षणासोबत संस्कारांची जोड – श्री नरसिंह हायस्कूल धोमची पालक सभेत प्रभावी मांडणी”
पत्रकार अनिल वाडकर सातारा जिल्हा संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“शिक्षणासोबत संस्कारांची जोड – श्री नरसिंह हायस्कूल धोमची पालक सभेत प्रभावी मांडणी”

सातारा प्रतिनिधी अनिल वाडकर
श्री नरसिंह हायस्कूल, धोम येथे आज पालक सभेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सभेस मुख्याध्यापक आदरणीय श्री दत्तात्रय देसाई सर, आदरणीय श्री कृष्णा कांबळे सर, शिक्षकवर्ग तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
सभेमध्ये देसाई सरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये समन्वय असणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी कोणती पावले उचलावीत याबाबत सखोल मार्गदर्शन केले. पालक आणि मुलांमध्ये मैत्रीपूर्ण नाते असणे गरजेचे असल्याचा महत्त्वपूर्ण सल्लाही त्यांनी दिला. शाळेतील शिक्षण पद्धती आणि गुणवत्ता याबाबत माहिती देत, पालकांनी वेळोवेळी शाळेत येऊन मुलांची शैक्षणिक प्रगती तपासावी, असेही त्यांनी सुचवले.
यानंतर कांबळे सरांनीही शाळेची वैशिष्ट्ये आणि शिक्षण पद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली. आरपीएस स्टार न्यूजचे पत्रकार अनिल वाडकर आणि रेखा येवले यांनी मातृभाषेत शिक्षण घेण्याचे महत्त्व आणि त्यातील गांभीर्य पालकांना पटवून दिले.
शाळेबद्दल माहिती घेतल्यावर असे स्पष्ट झाले की, श्री नरसिंह हायस्कूल धोम येथे केवळ शिक्षणच नव्हे तर एक आदर्श आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व घडवले जाते. निसर्गाच्या सानिध्यात वसलेली ही मराठी शाळा शिक्षणाच्या दर्जामुळे विशेष ठरते. सर्व पालकांनी या शाळेला भेट देऊन शिक्षणाची गुणवत्ता अनुभवावी, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमात शिक्षक श्री वैभव देसाई व श्री चंद्रकांत धोंगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पालक प्रतिनिधी म्हणून श्री गणेश पांबरे यांनीही विद्यालयाबद्दल आपले मत मांडले. यावेळी शिक्षक अमरजीत वसावे, श्री नाना चिंचकर, कुमारी उमा येवले, सौ. संगीता देसाई, संदीप महाळुणकर तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी कांबळे सर यांनी उपस्थितांचे आभार मानून पालक सभेची सांगता केली.




