वाई पेटलं! शिंदे दाम्पत्यांविरोधात राष्ट्रवादीचा ‘जोडा मारो’ संताप – किसनवीर चौकात पुतळा दहन; विराज शिंदे यांच्या घरासमोर घोषणाबाजीमुळे तणाव.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई पेटलं! शिंदे दाम्पत्यांविरोधात राष्ट्रवादीचा ‘जोडा मारो’ संताप – किसनवीर चौकात पुतळा दहन; विराज शिंदे यांच्या घरासमोर घोषणाबाजीमुळे तणाव.

सातारा प्रतिनिधी सारिका गवते
वाई शहरातील किसनवीर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे दाम्पत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत ‘जोडा मारो’ आंदोलन छेडले. विराज शिंदे व बाल कल्याण सभापती सौ. ऋतुजा शिंदे यांच्या निषेधार्थ त्यांच्या पुतळ्याला जोड्यांनी मारून दहन करण्यात आले. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
नुकत्याच पार पडलेल्या सभापती निवडीत ऋतुजा शिंदे यांनी राष्ट्रवादीशी गद्दारी करून भारतीय जनता पार्टीशी हातमिळवणी केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेमुळे वाई तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीने सभापती निवड प्रक्रियेदरम्यान काळ्या फिती बांधून सभात्याग केला होता. तरीही ऋतुजा शिंदे यांनी अर्ज दाखल करून बाल कल्याण सभापती पद स्वीकारल्याने पक्षाची जिल्हाभर नाचक्की झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दाखविलेला विश्वास फोल ठरवल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
सोमवारी सकाळी अकरा वाजता महागणपती घाटावरून निषेध मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा किसनवीर चौक मार्गे विराज शिंदे यांच्या घरावर पोहोचला. यावेळी “राजीनामा द्या”, “पुन्हा निवडणुकीला सामोरे जा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांच्या संतापामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते.
विराज शिंदे यांच्या घरासमोर कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे दाम्पत्यांचा जाहीर निषेध करत तीव्र शब्दांत टीका केली. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
आंदोलनादरम्यान पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही.
या मोर्चात राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रतापराव पवार, किसनवीर सहकारी कारखान्याचे चेअरमन प्रमोद शिंदे, बाजार समिती सभापती मोहनराव जाधव, जिल्हाउपाध्यक्ष महादेव मस्कर, जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, वृषाली चव्हाण, शशिकांत पवार, अनिल जगताप, सत्यजित वीर, दिलीप पिसाळ, मदन भोसले, शिवाजीराव पिसाळ, विक्रम पिसाळ, विनायक येवले, बाजीराव महांगडे, राजेश शिंदे, संपतराव महांगडे, डॉ. नितीन कदम, भारत खामकर, प्रदीप चोरगे, सनी चव्हाण, प्रमोद अनपट, बाळासाहेब चिरगुटे, मयूर खरात, नितीन चौरे, नितीन मांढरे, विलास मांढरे, सतीश मांढरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.




