विटा:-शिवप्रताप मल्टीस्टेटचा ८७७ कोटींचा व्यवसाय पूर्ण – सहकार क्षेत्रात दमदार झेप!
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

विटा:-शिवप्रताप मल्टीस्टेटचा ८७७ कोटींचा व्यवसाय पूर्ण – सहकार क्षेत्रात दमदार झेप!

विटा |
सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को. ऑप क्रेडिट सोसायटी लि., विटा यांनी ८७७ कोटींचा एकूण व्यवसाय पूर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे ५.९१ कोटींचा निव्वळ नफा आणि ०% NPA ही भक्कम आर्थिक स्थिती संस्थेच्या पारदर्शक व सक्षम व्यवस्थापनाची साक्ष देत आहे.
संस्थेने गेल्या काही वर्षांत सरासरी २०% वाढ नोंदवली असून, जागतिक आर्थिक मंदी, अस्थिर परिस्थिती आणि युद्धजन्य वातावरण असतानाही सभासदांचा अढळ विश्वास आणि संस्थेच्या कार्यपद्धतीमुळे ही प्रगती साध्य झाल्याचे संस्थेचे चेअरमन मा. शेखर (भाऊ) साळुंखे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, संस्थेचे व्यवस्थापन केवळ संख्यात्मक वाढीवर नव्हे तर गुणात्मक वाढीवर अधिक भर देत आहे. पारदर्शकता, शिस्तबद्ध कारभार आणि सभासदांच्या हिताचे निर्णय यामुळेच संस्था आज या उंचीवर पोहोचली आहे. बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार अत्यंत गरजेचा असून, शिवप्रताप मल्टीस्टेट ही नेहमीच तंत्रज्ञानाच्या बाबतीत अग्रेसर राहिलेली संस्था आहे. बँकिंग क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून त्याचा प्रभावी वापर करणारी ही एक अग्रगण्य पतसंस्था असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात कार्यकारी संचालक ॲड. मा. विठ्ठलराव साळुंखे यांनी संस्थेची सविस्तर आर्थिक आकडेवारी जाहीर करताना सांगितले की, संस्थेच्या ठेवी ४९० कोटी, कर्जे ३८७ कोटी, गुंतवणूक १४० कोटी तर सोने तारण कर्ज २५० कोटी इतके असून, ०% NPA ही संस्थेची मजबूत आर्थिक स्थिती दर्शवते. ही आकडेवारी संस्थेच्या सक्षम आर्थिक नियोजनाचे आणि जोखीम व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे.
या यशामागे सभासदांचा विश्वास, संचालक मंडळाचा काटेकोर व पारदर्शक कारभार आणि कर्मचारी वर्गाची तत्पर, ग्राहकाभिमुख सेवा हेच खरे बळ असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
या प्रसंगी व्हा. चेअरमन मा. हणमंतराव सपकाळ, सर्व संचालक, पदाधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते. संस्थेच्या या यशस्वी वाटचालीमुळे भविष्यातही सहकार क्षेत्रात नवे विक्रम प्रस्थापित करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.




