श्रीरामपूर:-ऐतिहासिक देणगीने उजळली आळंदी! – वाढत्या विज बिलाला स्मार्ट उत्तर – सोलर उर्जेकडे मोठी झेप!
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

ऐतिहासिक देणगीने उजळली आळंदी! – वाढत्या विज बिलाला स्मार्ट उत्तर – सोलर उर्जेकडे मोठी झेप!

तालुका प्रतिनिधी संजय पगारे
श्रीरामपुर / माळेवाडी प्रतिनिधी
विश्वकर्मा पांचाळ सुतार संस्था, आळंदी देवाची यांनी भविष्यातील वाढत्या विजेच्या गरजेचा विचार करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संस्थेच्या वतीने ६ केव्ही क्षमतेचा सोलर पॅनल प्रकल्प यशस्वीरीत्या उभारण्यात आला आहे.
🌞 ३ लाख २५ हजारांची भव्य देणगी!
जुन्नर तालुक्यातील काले गावचे व मुंबई येथील रहिवासी दानशूर श्री पंकज विलासराव भागवत, त्यांच्या पत्नी सौ. जान्हवी पंकज भागवत व मातोश्री श्रीमती आशाताई कैलासराव भागवत यांनी कै. कैलासराव शंकरराव भागवत यांच्या स्मरणार्थ ही भरीव देणगी दिली.
📅 रामनवमीच्या पवित्र मुहूर्तावर उद्घाटन!
दिनांक २६ मार्च २०२६ रोजी रामनवमीच्या शुभ दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत या सोलर प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न झाले.
🏆 संस्थेच्या इतिहासातील सर्वात मोठी देणगी!
या देणगीमुळे संस्थेच्या ऊर्जा खर्चात बचत होणार असून पर्यावरणपूरक उपक्रमालाही चालना मिळणार आहे.
🙏 मनःपूर्वक आभार व अभिनंदन!
संस्थेच्या वतीने दाते कुटुंबाचे तसेच हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व विश्वस्तांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.




