बहुजन विकास ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ सोहळा उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा :-9167564361

बहुजन विकास ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ सोहळा उत्साहात संपन्न. बहुजन विकास ट्रस्ट महाराष्ट्र राज्य कार्यालय नागठाणे तालुका जिल्हा सातारा येथे दहावी बारावी विशेष प्राविण्य मिळवलेल्या नागठाणे भागातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार गौरव चिन्ह देऊन करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष श्री बत्तु मोहिते माजी सहायक पोलिस निरीक्षक मुंबई राष्ट्रपती पोलीस पदक विजेते यांच्या अध्यक्षतेखाली सन २०२१-२२ दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला तर संस्थेचे कार्य अध्यक्ष मा.जीवन मोहिते यांनी प्रास्ताविकात संस्थेचे कार्याची माहिती दिली त्या वेळी प्रमुख उपस्थिती बोरगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.चेतन मचले साहेब.संभाजी ब्रिगेडचे सातारा जिल्हा अध्यक्ष श्री अनिल जाधव.पाठ्यपुस्तक अभ्यास निर्मिती मंडळ सदस्य पांडुरंग पवार सर. उपसरपंच अनिल साळुंखे. समाज सेवक मधुकर खुळे.साहित्यिक प्रकाश कांबळे.भिमशक्तीचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजरत्न कांबळे.शिवलीगं दळवी संस्थेचे पदाधिकारी सदस्य शिक्षक पालक उपस्थित होते.