गुरुपौर्णिमा निमित्त औंधकर मठात विविध कार्यक्रमाचे आयोजन.
प्रतिनिधी:-दिलीप पुस्तके :-9890318605

गुरुपौर्णिमा निमित्त औंधकर मठात विविध कार्यक्रमाचे आयोजन मायणी प्रतिनिधी___येथील सद्गुरु मुनी महाराज औंधकर मठामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु महाराजांची पाद्यपूजा गुरुवंदना शिवदीक्षाविधी तसेच सद्गुरु गुरु महाराज संजीवन समाधीवर कलशारोहण व नंदी महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे आले असल्याची माहिती औंधकर महाराज यांनी दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की बुधवार दिनांक 13 जुलै रोजी सकाळी सहा ते आठ सद्गुरु मुनी महाराज समाधी रुद्राभिषेक बिल्वार्चण सकाळी दहा ते बारा महाराजांची पाद्यपूजा बारा वाजता मंगल आरती दिनांक 14 रोजी बिल्वार्चण कार्यक्रम सकाळी सहा ते आठ समाधीस रुद्राभिषेक 9 ते 12 कलश व मूर्तीची शोभायात्रा बारा वाजता मंगल आरती व प्रसाद पंधरा जुलै रोजी गंगाधर शिवाचार्य औंधकर महाराज यांच्या उपस्थितीत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कलशारोहण शिवदीक्षा समारंभ इत्यादी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा कार्यक्रमाचे नियोजन वीरशैव लिंगायत समाज औंधकर महाराज व मोरेश्वर कपाळे यांनी केले आहे