ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माध्यमिक विद्यामंदिर, सदाशिवगड येथे आषाढी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी :-विनोद पाटील कराड :-9762274165

माध्यमिक विद्यामंदिर, सदाशिवगड येथे आषाढी दिंडी सोहळा उत्साहात साजरा

यशवंत शिक्षण संस्था सदाशिवगडचे माध्यमिक विद्यामंदिर, सदाशिवगड ओगलेवाडी, ता.कराड , जि. सातारा येथे शनिवारी दि.०९.०७.२०२२ रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळाचे आयोजन केले होते कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे सचिव श्री.डी.ए.पाटील सर यांचे हस्ते पालखी पुजनाने झाले.
शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी ज्ञानोबा तुकाराम भजनाने सुरूवात झाली. इयत्ता ५ वी ते १०वी सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी एक एक अभंग सादर केला. तसेच गोल रिंगण व फुगड्या अशें पारंपरिक खेळ खेळण्यात आले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे‌ मुख्याध्यापक श्री.देशमाने सर यांनी केले . सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेच्या सांस्कृतिक विभागप्रमुख सौ.पानवळ मॅडम यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे उपक्रमशील शिक्षक कु.पाटील मॅडम,सौ.पोळ मॅडम, श्री.गोसावी सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रतिनिधी -विनोद पाटील उपाध्यक्ष कराड तालुका

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button