मावळ (तालुका )पवना धरण परिसरात पर्यटकांची गर्दी.
प्रतिनिधी:- धर्मेंद्र ठाकर :-9960044802

मावळ (तालुका )पवना धरण परिसरात पर्यटकांची गर्दी.
पवना धरण परिसरामध्ये मागील 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने परिसरामधील छोटेमोठे सर्व धबधबे वाहू लागले आहेत. या धबधब्यांमध्ये भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी मुंबई पुण्यासह विविध राज्यांमधील पर्यटकांची रविवारी गर्दी पाहायला मिळाली. सह्याद्रीच्या पर्वत रांगामधील धबधबे जणू काही पर्यटकांना खुणावत आहेत. सर्वत्र हिरवेगार झालेले डोंगर पर्यटकांना खुणावत आहेत. दुसरा शनिवार आणि रविवार अशी लागून आलेल्या सुट्टीचे औचित्य साधून पर्यटकांनी पाण्यामध्ये भिजण्याचा मनमुराद आनंद लुटलेले पहायला मिळाले.
गेल्या काही वर्षांपासून पर्यटन पंढरी म्हणून नावा रुपाला आलेला संपूर्ण मावळ तालुका आणि या तालुक्यातील पवना धरण, तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर हे किल्ले, बेडसे, भाजे, कार्ले लेणी पर्यटकांना आकर्षित करत आहेत.