आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सायगाव:-श्रीराम जन्मोत्सवानिमित्त जावळेवाडी येथे पारायण व अखंड हरिनाम सप्ताह….

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त जावळेवाडी येथे पारायण व अखंड हरिनाम सप्ताह….

(अजित जगताप)

सायगाव दि: गेली छत्तीस वर्ष श्रीक्षेत्र जावळेवाडी (दरे खुर्द) ता. जावळी या ठिकाणी ह भ प रेवडीकर अण्णा, ह भ प शंकर बुवा, ह भ प ज्ञानेश्वर माऊली, ह भ प धोंडीराम बुवा, ह भ प व्यंकट बुवा यांच्या प्रेरणेने श्री ज्ञानेश्वर सामुदायिक पारायण व अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. यानिमित्त जावळेवाडी (दरेखुर्द) परिसरात अध्यात्मिक आणि श्रीराम जन्मोत्सवाने चैतन्याचे वातावरण पसरले आहे. शुक्रवार दिनांक २० मार्चपासून हा श्रीराम जन्मोत्सव सुरू होत .
या कार्यक्रमासाठी सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री हरी जागर कार्यक्रमासाठी मोरघर, जावळेवाडी, सायगाव, कदमवाडी , दरेखुर्द, दुदुस्करवाडी ,मेरुलिंग, खर्शी तर्फ कुडाळ, आनेवाडी महिगाव सोनगाव गोपाळ पंथाची वाडी, पानस, कुडाळ परिसरातील वारकरी संप्रदाय व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. दिंडी सोहळा, दीपोत्सव, हरिपाठ, श्री रामजन्म ,काल्याचे किर्तन सार्वजनिक महाप्रसाद त्याचबरोबर या कार्यक्रमाचे निमित्त कलश, प्रतिमा, ध्वज, ज्ञानेश्वरी, विना पूजन मोठ्या उत्साहात पार पडले आहे.
अध्यात्मिक वारसा जपणाऱ्या परिसरातील श्रीराम जन्मोत्सवासाठी सर्व परिसरातील भाविक सहभागी झालेले आहेत. या कार्यक्रमाला ह भ प शंकर धुमाळ, ह भ प संजय गायकवाड, ह भ प रामदास मोरे, ह भ प रमेश भिलारे, ह भ प दत्तात्रय धुमाळ, नामदेव धुमाळ यांनी श्री राम जप केला तर किर्तन सेवा रामदास सुर्वे महाराज, धनश्री तरडे, चैतन्य पाडळे महाराज, अविनाश महाडिक महाराज, सुनील यादव महाराज, गणेश किरवे महाराज यांनी योगदान दिले. या कार्यक्रमासाठी माजी सैनिक इंद्रजीत मोहन भिलारे, माजी सैनिक चंद्रकांत भीमराव धुमाळ, फौजी पवन संतोष धुमाळ, समीर गणपत बगाडे तो कांताबाई धुमाळ शिवाजी धुमाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
श्रीराम जन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी आत्माराम धुमाळ, हिरालाल धुमाळ, परेश धुमाळ, सुनंदा भिलारे, सरपंच सीमा विजय जाधव, माजी सरपंच कांताबाई नामदेव धुमाळ, दिनकर बगाडे, विलास झिमन, सौ .मीना जाधव, संतोष धुमाळ जनार्दन भिलारे यांच्यासह दरे खुर्द जावळेवाडी परिसरातील ग्रामस्थ एकजुटीने सहभागी झाले आहेत. आबालवृद्ध भाविकांच्या उत्साहामध्ये श्रीराम जन्मोत्सव पार पडला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button