पारनेर:-शिव पाणंद चळवळीला मोठे यश :शेतरस्ते अडवणाऱ्यांवर सरकारचा कठोर निर्णय.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिव पाणंद चळवळीला मोठे यश :शेतरस्ते अडवणाऱ्यांवर सरकारचा कठोर निर्णय.

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी राजकुमार इकडे
अखेर विधानभवन,आझाद मैदानावरील आंदोलनातील मागण्या मान्य- शरद पवळे (प्रणेते,महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळ)
पारनेर (राजकुमार इकडे)मुंबई : राज्यातील शेतकरी आणि ग्रामीण भागातील वाहतुकीच्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुंबई विधानभवनावर झालेल्या शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या लक्षवेध आंदोलनातील प्रमुख मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतरस्ते अडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी सांगितले की, “मागण्या मान्य होणे ही मोठे यश आहे; मात्र शासन निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी अधिक महत्त्वाची आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, चळवळ शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणार आहे.
राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना अंतर्गत सुधारित शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयानुसार, गाव नकाशावर असलेल्या किंवा सार्वजनिक शेतरस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
कठोर नियमांची अंमलबजावणी
शेतरस्ता अडवणाऱ्यांना ७ दिवसांची नोटीस
नोटीसनंतरही अतिक्रमण न काढल्यास प्रशासनाकडून थेट कारवाई
संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड व Farmer ID ५ वर्षांसाठी ब्लॉक
५ वर्षे सर्व शासकीय योजनांपासून वंचित
*शेतकऱ्यांसाठी दिलासा*
रस्त्यासाठी सक्तीचे भूसंपादन नाही
स्वेच्छेने दिलेल्या जमिनीवर स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्क माफ
जमीन शासनाच्या नावे नोंद होणार
ग्रामीण भागात शेतीमाल वाहतुकीसाठी बारमाही शेतरस्ते ही अत्यावश्यक गरज असल्याने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी वाद कमी होऊन शेती विकासाला चालना मिळेल यासाठी प्रत्यक्ष प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.




