नागठाणे नगरीत आजी-माजी सैनिकांची स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

नागठाणे नगरीत आजी-माजी सैनिकांची स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

तालुका प्रतिनिधी महेश मोहिते
सातारा :-नागठाणे नगरीत आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत सातारा जिल्हा सैनिक बँकेचे संचालक श्री.दत्तात्रय साळुंखे आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री कॅप्टन दिलीप मोहिते साहेब, कॅप्टन चंदुगडे आण्णा, सुभेदार मनोहर साळुंखे हवालदार अरविंद कदम, हवालदार शहाजी साळुंखे हवालदार पंढरीनाथ कदम, शेख साहेब हवालदार लक्ष्मण साळुंखे हवालदार रामचंद्र साळुंखे तसेच स्वच्छता मोहीम साठी प्रामुख्याने उपस्थित राहिलेले नागठाणे गावचे पंचायत समितीचे विद्यमान सदस्य श्री.संतोष लक्ष्मण साळुंखे,आजी व माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमादरम्यान सहभागी सैनिकांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले व परिसर स्वच्छ राखण्याचे आवाहन केले. तसेच “स्वच्छ गाव, सुंदर गाव” हा संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या मोहिमेला स्थानिक नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. आजी-माजी सैनिकांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.




