ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पाटण तालुका पंचायत समितीला नवे नेतृत्व; शिवसेना शिंदे गटाच्या सौ.सविता ताई विजय पवार यांचा सत्कार.

पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राइम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पाटण तालुका पंचायत समितीला नवे नेतृत्व; शिवसेना शिंदे गटाच्या सौ.सविता ताई विजय पवार यांचा सत्कार.

सातारा प्रतिनिधी महेश मोहिते

सातारा: सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेना शिंदे गट पक्षाच्या विद्यमान सदस्या सौ.सविता ताई विजय पवार यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सातारा पंचायत समितीचे व नागठाणे गणाचे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान सदस्य श्री.संतोष लक्ष्मण साळुंखे यांच्या हस्ते सविताताई विजय पवार यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.नुकत्याच पार पडलेल्या निवड प्रक्रियेत सविता ताई पवार यांनी सभापती पदाची धुरा स्वीकारली असून त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पाटण तालुक्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.सत्कार समारंभात नागठाणे गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते ग्रामपंचायत विद्यमान सदस्य श्री.दत्तात्रय साळुंखे तात्या, माझी ग्रामपंचायत सदस्य श्री.मारुती मोहिते, सदस्य श्री.संजय साळुंखे, नागठाणे गावच्या विकास सेवा सोसायटीचे व्हा.चेअरमन सन्मानीय श्री गोरख यादव, युवा उद्योजक श्री अजित ताटे दादा, सौरभ साळुंखे भैय्या, प्रगतशील बागायतदार श्री.संभाजी साळुंखे, श्री.प्रशांत भोसले व समस्त ग्रामस्थ शिवसैनिक यांनी सविता ताईंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सविता ताईंनी ही सर्वांचे आभार मानत सापडे गावचे शेतकरी हे पाटण तालुक्याशी निगडित असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना विविध योजनेचे सहकार्य करण्याचे तसेच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते व विकासकामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमाला विविध मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button