ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुणे:-“भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचा नवा दमदार आवाज – कल्याणजी नामुळे”

पत्रकार विजय देवकुळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पुणे:-“भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचा नवा दमदार आवाज – कल्याणजी नामुळे”

 जिल्हा प्रतिनिधी विजय देवकुळे

पुणे : खडकवासला मतदारसंघातील गोकुळ नगर पठार, वारजे माळवाडी, पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. कल्याणजी नामुळे साहेब यांची भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, पुणे शहर चिटणीस पदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या निवडीमुळे परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम करत असलेल्या श्री. कल्याणजी नामुळे यांनी विविध सामाजिक उपक्रम, जनसंपर्क आणि संघटनात्मक कामातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर टाकलेली ही जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना अध्यक्ष सुनीलजी खंडाळे आणि भाजपा शहराध्यक्ष धीरज जी घाटे साहेब यांनी सांगितले की, “श्री. कल्याणजी नामुळे साहेब यांचा सामाजिक क्षेत्रातील अनुभव आणि कार्यतत्परता लक्षात घेता ते भारतीय जनता पार्टीचा विचार सर्वदूर पोहोचवून पक्षाने दिलेल्या कार्यक्रमांची प्रभावी व यशस्वी अंमलबजावणी करतील, याची पूर्ण खात्री आहे.”
ते पुढे म्हणाले की, “‘राष्ट्र प्रथम’ या विचारातून समाजातील सर्व घटकांना सोबत घेत ते पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. त्यांच्या निवडीमुळे खडकवासला मतदारसंघासह पुणे शहरात पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला नवे बळ मिळेल.”
अध्यक्ष सुनीलजी खंडाळे आणि भाजपा शहराध्यक्ष धीरज जी घाटे साहेब यांनी श्री. कल्याणजी नामुळे साहेब यांना त्यांच्या भावी सामाजिक व राजकीय कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या नेतृत्वात पक्षाचे कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button