सातारा:-नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य यांची अंगणवाडी सेविका यांच्या क्रीडा स्पर्धेत भेट.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा:-नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य यांची अंगणवाडी सेविका यांच्या क्रीडा स्पर्धेत भेट.

सातारा प्रतिनिधी महेश मोहिते
सातारा:-एकात्मिक बालविकास प्रकल्प सेवा योजना सातारा अंतर्गत निगडी वंदन येथील प्राथमिक शाळेतील मैदानावरती साताऱ्या तालुक्यात असणारे १६ मंडल मधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या क्रिडा स्पर्धेचे आयोजन एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मा.श्री. भिंगारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भरविण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित सातारा पंचायत समितीचे नागठाणे गणाचे सदस्य मा.श्री. संतोष लक्ष्मण साळुंखे पाटील साहेब यांनी उपस्थिती लावली होती तसेच त्यांनी सातारा तालुक्यातून स्पर्धेसाठी आलेल्या सर्व अंगणवाडी सेविका व प्रामुख्याने नागठाणे बीट मधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना खेळात प्रोत्साहन देऊन स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या क्रीडा स्पर्धांमध्ये धावणे, क्रिकेट लगोरी, दोरीखेच, लिंबू-चमचा यांसारख्या विविध खेळांचा समावेश करण्यात आला होता. स्पर्धेमुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कामाच्या धकाधकीतून थोडा विरंगुळा मिळावा तसेच त्यांच्यातील क्रीडा गुणांना वाव मिळावा या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन प्रकल्प अधिकारी मा.श्री.भिंगारे साहेब यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या वेळी प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते. स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर लाडके पंचायत समिती सदस्य मा.श्री.संतोष लक्ष्मण साळुंखे साहेब यांचा पण सत्कार करण्यात आला या क्रीडा स्पर्धांमुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मध्ये एकोपा वाढण्यास मदत झाली असून प्रगतशील बागायतदार श्री.सागर साळुंखे माजगावचे ग्रामस्थ रायसिंग जाधव आणि ग्रामस्थ यांनी स्पर्धेत आलेल्या अंगणवाडी सेविकेचे कौतुक केले.




