सैदापूर:-(कराड)-राज्यस्तरीय “आदर्श मुख्याध्यापिका महिला गौरव पुरस्कार” लाहोटी कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.हेमलता जंगम यांना प्रदान.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

राज्यस्तरीय “आदर्श मुख्याध्यापिका महिला गौरव पुरस्कार” लाहोटी कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. हेमलता जंगम यांना प्रदान.

सैदापूर (कराड ):-
समाजभूषण बाबूराव गोखले सार्वजनिक ग्रंथालय, सैदापूर यांच्या सौजन्याने दिला जाणारा राज्यस्तरीय “आदर्श मुख्याध्यापिका महिला गौरव पुरस्कार” लाहोटी कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. हेमलता जंगम यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रदान करण्यात आला.
हा सन्मान सौ. शर्मिष्ठा पोळ (आगार प्रमुख, कराड शहर) यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी डॉ. युगांतरा कदम (डीन, कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय, कराड) यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.
या सन्मानामुळे प्रशालेसह परिसरात आनंदाचे वातावरण असून शिक्षण मंडळ कराड, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचेकडून सौ. हेमलता जंगम यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक कार्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




